वर्षभरात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर कोल्हापूरमध्येही राजकारणाच्या पटलावर उलथापालत झाली. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे राजकारणातील वाढते महत्त्व रोखण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी केलेले एकत्रितपणे प्रयत्न सफल ठरले. पाटील यांना खिंडीतच रोखून त्यांच्या महत्त्वकांक्षांना ब्रेक देण्याची काम जिल्ह्याच्या नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात Politics नवी समीकरणे जुळणार आहेत.
शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत Elections महाविकास आघाडी पुढे मोठी आव्हाने असणार आहेत. केवळ अस्तित्वाला शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना Shivsena यांच्यापुढे नेतृत्वाची कमतरता, आणि एकीचे बळ टिकवणे हेच आव्हान असणार आहे. तर काँग्रेस पुढे नेतृत्वच टिकवणे आव्हान असणार आहे. महायुती मधील भाजप आणि शिवसेनेमधील पक्षांतर्गत नाराजी रोखण्याचे आपण नवीन वर्षात असणार आहे.
राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात झाला. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन आले. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने महायुती समोर आव्हान उभा केली. संकटावेळी सोबत आलेल्या खासदारांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी देऊन भाजपला जागा वाटपात धोबीपछाड दिला. दिलेला शब्द पूर्ण करत शिंदे यांनी दोन विद्यमान खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून महाविकास आघाडी पुढे आव्हान निर्माण केले.
मात्र सत्ता बदलामुळे काहीशी नाराजी असलेल्या महायुतीच्या उमेदवारांपुढे विजयासाठी मोठी कसरत करावी लागली. महाविकास आघाडी कडून हातकणंगले मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांनी प्रचारात आघाडी घेतली.
लोकसभा निवडणूक निकालात हातकणंगले महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांनी मिळवत गड राखला. तर कोल्हापूरच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रचंड मताधिक्काने महायुतीचे संजय मंडलिक यांचा पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भारावून गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात तगडे उमेदवार शोधले. पण ज्या मतदारसंघात निभाव लागणार नाही अशा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आयात केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांतर्गत नाराजी काही मतदारसंघात उफाळून आली.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल मिळणार या आशेने इच्छुकांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षात प्रवेश केला. कागल आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतून दाखल झालेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे आणि आमदार के पी पाटील यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून उमेदवारी मिळवली. राधानगरीतून के पी पाटील यांना ठाकरे यांचा शिवसैनिक सोबत घेऊन जाता आला नाही.
हे देखिल वाचा-
तर चंदगड मधून विधानसभा निवडणुकीत बाहेरचा उमेदवार डॉ.नंदाताई बाभुळकर यांना घेतल्याने महाविकास आघाडी मधील अंतर्गत नाराजी समोर आली. शिवाय प्रत्येक मतदारसंघातील विजयाची जबाबदारी खांद्यावर घेऊन काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी एक मतदारसंघात प्रचार सभा आणि दौरे केले. तर दुसरीकडे महायुतीकडून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये समन्वय साधून चंदगड वगळता सर्व मतदार संघात उमेदवार दिल्याने अंतर्गत गटबाजी दिसून आली नाही.
शिवाय राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकरी शेतीपंप विज बिल माफ, पंतप्रधान किसान योजना, यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कोल्हापूर जिल्ह्याने भरभरून आशीर्वाद दिले. विधानसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. लोकसभेच्या विजयाने भारावून गेलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत झटका बसला.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला मात्र यंदा खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. केवळ पदाधिकारी नावापुरतेच शिल्लक राहिले. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे दोन विधान परिषदेचे आमदार आणि एक खासदार आहेत.
पण आगामी नव्या वर्षातून नवी समीकरणे जुळणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत जे महायुतीचे आमदार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना विधान परिषदेत मदत करत होते. त्याच आमदारांच्या विरोधात पाटील यांनी विधानसभेत विरोधात प्रचार केल्याने विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांना फेरमाडणी करावी लागणार आहे.
हे देखिल वाचा-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेला आपल्याला पूरक मतदान होईल या पद्धतीने सतेज पाटील यांना लढावे लागणार आहे. महायुती मधील नेत्यांमध्ये असलेला समन्वय भेदणे हेच पाटील यांच्यासमोर आव्हान असणार आहे. गोकुळ,कोल्हापूर जिल्हा बँक यासह आणि सहकारी संस्थांवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मैत्री कायम असली तरी सध्या तरी सहकारात बीमोड नाही हेच चित्र आहे.
पंचवार्षिक कार्यकाळ संपल्यानंतर माहितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार कोणत्याही क्षणी मैत्रीत खडा पडू शकतो. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी राज्यमंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील समन्वय सध्या तरी चांगला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नव्या वर्षात पुन्हा नवी समीकरणे निर्माण होणार आहेत.
जर या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या ठरल्यास तर दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचे आव्हान या नेत्यांकडे असणार आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना या सर्व नेत्यांविरोधात एकट्यांला खिंड लढवावी लागणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणि राज ठाकरेंच्या मनसेचे अस्तित्व हे केवळ नावापुरती शिल्लक आहे. त्याचे मतात कधीच रूपांतर झालेले नाही. अशा लोकांना सोबत घेऊन सतेज पाटील यांनाच जिल्ह्यातील विरोधी बाकावर बसलेले नेते म्हणून तोंड द्यावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.