
लवकरच 2024 संपून आता 2025 नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. सरत्या वर्षात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. निवडणुका, युद्ध, भूकंप, अतिवृष्टी, महापूर या आणि अशा असंख्य घटनांनी सरतं वर्ष भरून गेलं होतं. भारतातही अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या. अनेक राज्यात निवडणुका Elections झाल्या. अनेक ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळाले. तर विधानसभा निवडणुकीतून सूर गवसण्याचा काँग्रेसचा प्रयत्न निष्फळ ठरला.
बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षीय चिमुकलींवर लैंगिक अत्याचार Crime Against Women करण्यात आला. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर या प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत राहिले. याच पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये घडलेल्या आणि राज्यभर गाजलेल्या घटनांवर एक नजर टाकू या. Crime In Maharashtra Badlapur Encounter Case Critisism on Government by Opposition
विद्येचं मंदिर असलेल्या बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील व्यक्तीकडून निर्घुण कृत्य करण्यात आले. एका तीन वर्ष आठ महिने आणि सहा वर्षांच्या चिमुकलींवर शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली अन लोक रस्त्यावर उतरले. संतप्त जनतेने या प्रकाराबाबत रोष व्यक्त करत शाळेबाहेर तसंच रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन केले. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणीही नागरिकानी केली.
चिमुकलीने आईला तिच्या गुप्तांगात त्रास होत असल्याचे सांगितले. तिथे मुंग्या चावतात असे सांगितले. त्यानंतर आईने चिमुकलीला डॉक्टरकडे नेलं आणि तिथे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. या लहान मुलीसोबत घडलेल्या घटनेनंतर पालकांना मोठा धक्का बसला. दुसरीकडे आणखी एका चिमुकलीने तिच्या पालकांना गुप्तांगाजवळ त्रास होत असल्याचे सांगितलं. त्यासोबतच ती मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार नव्हती. पालकांनी याचा तपास केल्यानंतर त्यांना लेकीसोबत काय घडलं हे समजले. या दोन घटना समोर आल्यानंतर संपूर्ण बदलापूर हादरले.
अत्याचार करणारा आरोपी सापडला
आरोपी अक्षय शिंदेने दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. हा 24 वर्षीय आरोपी शाळेतच सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. सफाईसाठी नेमणूक करणाऱ्या कंपनीकडून त्याची शाळेत सफाई कर्मचारी म्हणून नेमले होते. चिमुकल्यांनी त्यांना त्रास होत असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि संपूर्ण घटना समोर आली.
हे देखिल वाचा-
त्यानंतर पालक पोलीस तक्रार करण्यासाठी पोहोचले, मात्र तब्बल 12 तास त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. इतक्या मोठ्या गुन्ह्यातही पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास विलंब केल्याने पोलीस महिलेची तात्काळ बदली करण्यात आली. दुसरीकडे शाळेतील दोन महिला कर्मचाऱ्यांनाही काढण्यात आले.
बदलापूर शहरातील या घटनेनंतर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. आता या बदलापुरातील या प्रकरणात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार केलेल्या आरोपी अक्षय शिंदेने शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आणखी एका चिमुकलीवर केलेल्या दुष्कृत्यानंतर त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी दोन लहान मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनंतर याप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमली. त्याशिवाय आता आणखी एका मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर एसआयटीकडून आरोपी अक्षय शिंदेविरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन चिमुकल्यांवर एकाच आरोपीने लैंगिक अत्याचार केले. 13 ऑगस्ट रोजी ही घटना सकाळी 9 ते 12 च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी 16 ऑगस्टला पालक पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले होते. मात्र तब्बल 12 तासांनी 14 ऑगस्टच्या रात्री 9 वाजता त्यांची तक्रार दाखल करुन घेतली.
चिमुकल्यांवरील अत्याचारचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येत होते. याबाबतची सुनावणी 27 ऑगस्टला झाली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणात केवळ एकच नव्हे, तर अनेक त्रुटी झाल्या असल्याचं सांगितले. तसंच पोलिसांनीही पोक्सो कायद्यांतर्गत असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन केल्याचं दिसत नसल्याचं सांगत पोलिसांच्या कामावरही ताशेरे ओढले.
हे देखिल वाचा -
या प्रकरणात नेमके काय घडलं?
पोलिसांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेविरोधात ठाणे पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस 23 सप्टेंबरला सायंकाळी तळोजा कारागृहातून पोलिस व्हॅनने घेऊन जात होते. यावेळी वाहनामध्ये चार पोलीस उपस्थित होते.
गाडी मुंब्रा बायपास रोडवर आली असता अक्षयने पोलिस निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेली पिस्तुल बळाचा वापर करुन खेचू लागला. त्यानतंर निलेश मोरेनं आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, झटापटीत पिस्टल लोड झाली आणि त्यामधील एक राऊंड त्यांच्या डाव्या मांडीत घुसल्यानं ते खाली पडले.
हे देखिल वाचा-
त्यानंतर अक्षयनं पिस्टलचा ताबा घेऊन एकलाही सोडणार नसल्याचं ओरडू लागला. त्यानं आमच्या दिशेनं दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे स्वतःच्या सरक्षणार्थ आम्ही अक्षय शिंदेच्या दिशेनं गोळी झाडली यामध्ये त्याचा मृत्यू झाला.'आम्ही स्वसंरक्षणार्थ गोळी घातली', असा दावा पोलिसांनी केला आहे. पण, अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले. दुसऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेंला मारलं असा आरोप विरोधकांनी केला.
त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्याचार झाला तेव्हा विरोधक फाशीची मागणी करत होते. आता एन्काऊंटर केल्यानंतर विरोध करत आहेत. यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असं म्हटलं होते. बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला.
यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर अक्षयच्या आई-वडिलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत पोलिसांवर आरोप केले होते. यावरुन विरोधकांकडून राजकारण सुरु झाले.
अक्षय शिंदेचा एनकाऊंटर झाल्यानतंर आता पोलिसांवर टीका झाली. हे सर्व षडयंत्र आहे. अक्षय शिंदेंचा ठरवून एन्काऊंटर करण्यात आला आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता.बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलिस त्यात जखमी आहे. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही, पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक केले, पहिजे अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने दिली होती. बदलापूर प्रकरणात सुरुवातीला विरोधकाने आरोपीच्या अटकेवरून गदारोळ केला. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर करण्यात आल्यानंतरही विरोधकांनी रान पेटवले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.