Kolhapur Thackeray Group Sarkarnama
कोल्हापूर

Milk Price Agitation : दूधदरावरून ठाकरे गट आक्रमक; ‘गोकुळ’चे टॅंकर अडविण्याचा प्रयत्न, पोलिसांसोबत झटापट

Thackeray Group News : शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत आज शिरगाव येथील गोकुळच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढला.

Rahul Gadkar

Kolhapur News : गेल्या दोन महिन्यांपासून गायीच्या दूध खरेदीदरावरून कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण पेटले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिवसेनेचा ठाकरे गट गायीच्या खरेदी दूधदरात वाढ करावी, या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. प्रतिलिटर दुधाला ३६ रुपये दूध मिळावा, या मागणीसाठी आज (ता. ११ नोव्हेंबर) ठाकरे गटाने गोकुळ दूध संघाचे मुंबईच्या दिशेने जाणारे टँकर रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. (Attempt by the Thackeray group to block Gokul Dudh Sangh's tanker)

शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत आज शिरगाव येथील गोकुळच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसैनिकांनी या वेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोकुळ प्रशासनाने शिवसेनेच्या आंदोलनाची धास्ती घेत सकाळीच टँकर मुंबईकडे रवाना केले होते. दरम्यान, सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या ठाकरे गटाने दूध संघावर मोर्चा काढत गायीच्या दुधाला ३६ रुपये प्रतिलिटर खरेदीदर देण्याची मागणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोकुळ प्रशासन वारंवार आश्वासन देत असल्याने ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘तुम्ही वेळ बदलली असेल, पण उद्याची वेळ आमची असेल. संचालकांच्या बैठकीत घुसून न्याय मागणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी दिला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोकुळ दूध संघात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले.

पुणे दूध संघाकडूनही खरेदीदरात कपात

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाने गायीचा दूध खरेदीदर ३४ रुपये केला आहे. हा दर वाढवण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांची आहे. राज्यातील सर्वाधिक दर देणारा गोकुळ दूध संघ आहे, पण हा दर वाढवण्याची मागणीही दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या (कात्रज) झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातही गायीच्या दूध खरेदीदरात घट केली आहे. प्रतिलिटर २८.८० पैसे इतका दर कात्रज दूध संघाने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT