- शिवाजी भोसले
Solapur News : बेधडक अन् स्फोटक वक्तव्यांमुळे मंत्री तानाजी सावंत हे कायम चर्चेत असतात. मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या मुद्द्यावर सावंत यांनी जणू सुतळी बॉम्ब फोडले. त्यावरून मनोज-जरांगे पाटील यांनी मंत्री सावंत यांना शिंगावर घेतले. आणि जरांगे-पाटील विरुद्ध सावंत असा खडाखडीचा सामना रंगला. त्यातून सावंत हे मराठ्यांच्या हिटलिस्टवर येण्याची शक्यता आहे. सावंत आणि जरांगे-पाटील या दोघांमधील संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. बघा सावंत आणि जरांगे-पाटील यांच्यामधील जशास तसा संवाद...
- सावंत : मराठा आरक्षण कधी मिळेल, हे सांगायला जर-तरच्या गोष्टी करायला मी काय भविष्यवाणी नाही. मी काय पंचांग घेऊन बसलेलो नाही...
- जरांगे-पाटील : आरक्षण कधी द्यायचं, कसं द्यायचं ते सरकारला कळतं. तुम्ही काय ज्ञान पाजळायची गरज नाही.
-सावंत : यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण तात्कालीन सरकारला का टिकवता आलं नाही, ठाकरेंच्या काळातील आरक्षण का गेलं? हा माझा प्रश्न आहे.
- जरांगे-पाटील : शायनिंग दाखवायची कशाला? श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपाशी नाही दाखवायची...ती शायनिंग तुमच्यापाशीच ठेवायची..मस्ती तिकडंच दाखवायची...आरक्षण का टिकलं नाही, हे बघावं.. सांगावं जरा समाजाला...मस्तीतल्या गप्पा हाणायच्या उगीच...
- सावंत : दिलेलं आरक्षण कायद्याच्या चाकोरीमध्ये टिकलं पाहिजे...
- जरांगे-पाटील : आरक्षण टिकतं का नाही, ते द्यायचं की नाही हे सरकारला कळतं आणि ते घ्यायचं का नाही, हे मराठ्यांना कळतं.
- सावंत : दोन वर्षे आरक्षणावर कोणीच काय बोललं नाही...आताच आरक्षणाचं वादळ का उठलं? वादळ कोण उठवतंय?
- जरांगे-पाटील : त्यांना काय वादळ दिसलं हे माहीत नाही. परंतु, मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होतंय हे खरं हाय. त्याला जर हे वादळ समजत असतील, त्याच्याबद्दल ते जर असं बोलत असतील तर ही मात्र मोठी शोकांतिका आहे मराठा समाजाची...
- सावंत : आरक्षणाच्या मुद्द्यावर 2024 मध्ये राजीनामा देण्याचं बघू या...बघू ना...31 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम आहे बघू ...आमचे राजे आहेत...छत्रपती आहेत...माझा मराठा समाज आहे..यांच्या माध्यमातून बघू ना... योग्य त्या वेळी, योग्य ती भूमिका घेऊ...
- जरांगे-पाटील : काय असतं... गोरगरिबांची टिंगल टवाळी उडविणार ना हे लोक... पैसा खूप ना आहे..पैसा खूप आहे...मराठ्यांच्या जिवावर सगळ्या गोष्टी मिळाल्यात ना यांना... पोट वाढलं ना ह्याचं... त्याच्यामुळं काय आता? भरून पुरले ना..यांना भरपूर आहे...त्यामुळे ती मस्त आहे, ती पैशाची... श्रीमंतीची...
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
करायला गेलं एक अन् झालं दुसरंच...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या 35 कुटुंबांचं पालकत्व मंत्री सावंत यांनी दत्तक घेतलं. त्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदतही केली. कार्यक्रमानंतरच्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी मराठा आरक्षणावर सुतळी बॉम्ब फोडले आणि ते वादात सापडले. करायला गेले एक अन् झालं दुसरंच असे ते झालं.
काही लक्ष्यवेधी
> जरांगे-पाटील भडकले सावंतांवर
> मस्ती नका दाखवू, आम्हाला विचारणारे तुही कोण? जरांगे-पाटलांचा सावंतांना सवाल
> ठाकरेंच्या काळातील आरक्षणाचं सांगता? तेव्हा तुम्ही कोठे होता, जरांगे-पाटलांचा सावंताना प्रश्न
> सावंताच्या वक्तव्यावर जरांगे-पाटलांचा पलटवार
> सावंतांच्या वक्तव्यावरून मराठा आरक्षणाच्या वादाला फोडणी
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.