Ajit Pawar Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar correction : अजित पवारांनी 'ती' चूक सुधारली; पुरवणी मागण्यात एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना दिले झुकते माप

Eknath Shinde News : महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद पाहावयास मिळतात.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसापासून नाराजीनाट्य रंगल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून मित्रपक्षांत कुरबुरी पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद पाहावयास मिळतात.

विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना जादा निधी दिली नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर करताना शिवसेनेच्या मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांची नाराजी दूर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. शिवसेनेच्या खात्यांना मोठा निधी देण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याला 15 हजार 465 कोटी रुपये मिळाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाला 9 हजार 68 कोटींचा निधी मिळाला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाला 3 हजार 798 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर अदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या महिला व बालविकास विभागाला 2 हजार 665 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. यावेळी नाराज असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांची नाराजी दूर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या खात्याला मोठया प्रमाणात निधी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांना निधी देताना हात आखडता घेतला जात असल्याची तक्रार केली जात होती. या तक्रारीची दखल घेत अजितदादांना अर्थखात्याकडून पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेच्या मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघांसाठी अधिक निधी मागितला आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारकडून अंतर्गत असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटातील अनेक आमदार आणि मंत्री असमाधानी होते. विशेषतः त्यांच्या मतदारसंघांमध्ये निधीच्या असमान वाटपाबद्दल अनेक तक्रारी होत्या. येत्या काळात अतिरिक्त निधीचे वितरण करण्यात येणार असल्याने आता तरी या मंत्र्यांची नाराजी दूर होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT