Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजितदादा महिन्यात दुसऱ्यांदा नांदेडमध्ये येणार ! काँग्रेस नेते टेन्शनमध्ये; राजकीय घडामोडीना आला वेग

Ajit pawar Nanded Visit News : आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांनी चार माजी आमदारांना सोबत घेत राष्ट्रवादीला मजबूत केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी खासदार भासकरराव पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने महिन्यातून दुसऱ्यांदा नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Nanded News : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे महायुतीचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील सर्व 9 पैकी 9 जागा जिंकल्या. त्यामधील 5 जागा भाजपने जिंकल्या तर 3 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या तर एकमेव लोहा-कंधारची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. पण गेल्या काही महिन्यांत पक्षविस्ताराच्या बाबतीत महायुतीतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरस ठरला आहे.

आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांनी चार माजी आमदारांना सोबत घेत राष्ट्रवादीला मजबूत केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी खासदार भासकरराव पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने महिन्यातून दुसऱ्यांदा नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यातच नांदेडमध्ये पाऊल ठेवताच अजितदादा पक्षवाढीच्या दृष्टीने मोठा निर्णय घेणार आहेत.

नांदेडच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री व भाजप नेते अशोक चव्हाण यांना मोठा शह देताना प्रताप पाटील- चिखलीकरांनी अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे. रविवारी (दि.२३) नरसी येथे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खतगावकर आणि त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यात आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

रविवारच्या प्रवेश सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दाखल होणार्‍या नांदेड जिल्ह्यातील माजी आमदारांची संख्या चार होईल. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी, गावोगावचे सरपंच व इतर प्रमुख कार्यकर्तेही भाजपाऐवजी राष्ट्रवादीमध्ये जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे सध्यस्थितीत महायुतीमध्येच प्रवेश देण्यासाठी चढाओढ दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रताप चिखलीकर यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करताना, माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या पक्षप्रवेशानिमित्त गेल्या महिन्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत लक्षवेधी प्रवेश सोहळा घडवून आणल्यानंतर त्याचदिवशी खतगावकर आणि त्यांच्या समर्थकांचा ‘राष्ट्रवादी’तील प्रवेश निश्चित झाला होता. त्यानंतर पवार यांनी या कार्यक्रमाकरिता २३ मार्च तारीख दिली होती. आपल्या प्रभावक्षेत्रांत तालुकानिहाय बैठका घेऊन समर्थकांना नव्या राजकीय प्रवासात आणण्याचा त्यांचा धडाका त्यांतून समोर आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने महिन्यातून दुसऱ्यांदा नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच नांदेडमध्ये पाऊल ठेवताच उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षवाढीच्या दृष्टीने मोठा निर्णय घेणार आहेत.

माजी खासदार खतगावकरांचे समर्थक जिल्हयात मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. त्यामधील बहुसंख्यकांना एकत्र आणून रविवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मुस्लीम व इतर अल्पसंख्याकांत खतगावकर यांचा चांगला संपर्क असल्यामुळे आतापर्यंत काँग्रेससोबत टिकून असलेला मुस्लीम समुदाय पुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे.

पक्षवाढीसाठी उचलले मोठे पाऊल

खतगावकर यांचा नरसी येथील पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अन्य नेते नांदेड शहरात येणार आहेत. विमानतळाजवळच्या एका हॉटेलमध्ये नांदेड व लगतच्या तीन जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांची बैठक ठेवण्यात आली आहे. ही बैठक झाल्यानंतर पवार आणि अन्य नेते देगलूर नाका भागातील एका मोठ्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहणार आहेत. तीन आठवड्यांच्या अंतराने अजितदादा दुसर्‍यांदा नांदेडला येत असून जिल्ह्यातील पक्षवाढीकडे त्यांनी लक्ष घातले असल्याचे समजते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT