amit shah, sudhir mungantivar  Sarkarnama
महाराष्ट्र

BJP big decision : अमित शहा यांनी मुनगंटीवारांना तातडीने दिल्लीत बोलावले; मोठा निर्णय होण्याची शक्यता

Political developments News : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत. अमित शहा यांनी मुनगंटीवारांना तातडीने दिल्लीत बोलावले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवल्याने नाराज असलेले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी यापूर्वी जाहीरपणे बोलावून दाखवली. मात्र, मागील काही महिन्यांपासून ते सर्वांसोबत जुळवून घेताना दिसत असतानाच शनिवारी त्यांना भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बोलावून घेतले आहे. त्यामुळे ते पुन्हा मंत्रिमंडळात परततील अशी आशा त्यांच्या समर्थकांना वाटू लागली आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मुनगंटीवार यांनी सुद्धा आपल्याला अमित शहा (Amit Shah) यांनी बोलावले असल्याचा दुजोरा दिला. मात्र, बैठकीसाठी येण्याचे निमंत्रण आपणाला दिले आहे. या बैठकीचा अजेंडा ठाऊक नाही, असे म्हणून त्यांनी याविषयावर अधिक बोलायचे टाळले. मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना युतीच्या कार्यकाळात ते राज्याचे वित्त मंत्री होते. अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळात ते वनमंत्री आणि सांस्कृतिक खाते त्यांच्याकडे होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या पूर्वी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर मुनगंटीवार यांच्याकडे महत्त्वाचे खाते सोपवले जाईल, असेच सर्वांना वाटत होते. मात्र त्यांना पक्षान मोठा धक्का दिला. पक्षांतर्गत सुरू असलेल्या चढाओढीने त्यांचा घात केल्याचे बोलले जाते. ते गडकरी यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

महायुतीचे सरकार आल्यानंतर गडकरी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. ही बाब अनेकांना खटकली. तेव्हापासून मुनगंटीवारांना बाजूला सारण्याचे प्लॅनींग सुरू झाले होते, असे सांगण्यात येते.

मुनगंटीवार यांना राज्याच्या राजकारणातून लांब ठेवण्यासाठी चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती, असाही दावा केला जातो. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्यासह भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले. ही धोक्याची घंटा समजून विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे फार धोके पत्करले नाहीत.

ज्येष्ठ आणि लोकप्रियता असलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली. त्यापूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र विनोद तावडे, एकनाथ खडसे यांना डच्चू देण्यात आला होता हे विशेष. मुनगंटीवार विधानसभेत पुन्हा निवडून आले. मात्र त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवले. त्यांच्या जिल्ह्यातील बाहेरून आलेले आमदार किशोर जोरगेवार यांना प्रमोट केले जात असल्याचे भाजपच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरून दिसून येते. आता अचानक त्यांना थेट अमित शहा यांनी दिल्लीत बोलावले आहे. हे बघता त्यांच्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT