jitendra awahad amol mitkari sarkarnama
महाराष्ट्र

Amol Mitkari : आव्हाडांना देण्यासाठी 1 लाखाच्या चेकवर मिटकरींनी केली सही; पण घातली 'ही' अट

Amol Mitkari Vs Jitendra Awhad : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी आमने-सामने आले आहेत.

Akshay Sabale

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह दिल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांना 'तुतारी' वाजवण्याचं आव्हान देत एक लाखाचं बक्षीस देणार, असं म्हटलं होतं. हे चॅलेंज आव्हाडांनी स्वीकारत रायगड येथे 'तुतारी' वाजवली होती. पण, आता मिटकरींनी एक अट ठेवली आहे. ( Amol Mitkari Latest News )

नेमकं प्रकरण काय?

"शिवरायांना नमन करून तुतारी वाजवत, रायगडावरून सुरुवात करणार आहे. दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज असेल," असं आव्हाडांनी म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर मिटकरी म्हणाले, "एक तुतारी द्या मज आणुनी फुंकी जी मी स्वप्राणाने... आमचं जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज आहे, त्यांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी. आपल्याकडून 1 लाखाचं बक्षीस घेऊन जावं. फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे. तुतारीला कालपासून मार्केट आहे. पण, हरकत नाही. विषारी तुतारी वाजवायला माणूस आहे."

अमोल मिटकरींचं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी स्वीकारलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर 'तुतारी' चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी 'तुतारी' उचलून वाजवली होती. त्यामुळे मिटकरी आव्हाडांना 1 लाख रुपये बक्षीस देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण, मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांच्या नावानं सही केलेला 1 लाख रुपयांचा चेक लिहून ठेवला आहे. मात्र, एक अट घातली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, "जितेंद्र आव्हाडांनी चॅलेंज स्वीकारलं, हे खोटं आहे. आव्हाडांनी स्वत: 'तुतारी' वाजवल्याचं दिसतं नाही. कारण, आव्हाडांच्या मागे उभारलेली माणसं 'तुतारी' वाजवत आहेत. एक लाख रुपयांचा चेक आव्हाडांच्या नावाने तयार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आव्हाडांनी 'तुतारी' आणून माध्यमांसमोर वाजवावी."

"माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून ज्याला 50 हजार रुपयांच्या पगारीवर अजित पवारांनी ठेवल्याचं आव्हाड वारंवार म्हणतात. त्यांनी माझा दोन महिन्यांचा पगार घेऊन जावावा. माझ्याबद्दल द्वेष असेल, तर खरमुसेसारखी मलाही मारहाण केली, तर चालेल. पण, 1 लाख रुपयांचा चेक तयार आहे. पण, फक्त आव्हाडांनी एकट्यानं तुतारी वाजवावी," अशी अट मिटकरींनी घातली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT