Ladki bahin Yojna  Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजना राबवणाऱ्या मध्य प्रदेश सरकारची वर्षपूर्ती; 'सीएम'ने केले मोठे विधान; म्हणाले, तिजोरीवर...

political News : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभव पत्करावा लागला होता. यावेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलासाठी 'लाडकी बहीण' योजना राबवली.

Sachin Waghmare

Mumbai News : देशातील जवळपास नऊ पैकी आठ राज्यात 'लाडकी बहीण' योजना गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे महिला मतदार मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षाकडे वळल्या. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत झाला. मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक झाली. निवडणुकीच्या काही महिने आधी भाजप सरकारने 'लाडली बहना' योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठी मदत झाली. त्याचा फायदा भाजपला या निवडणुकीत झाला. (Ladki Bahin Yojna News)

भाजपने (Bjp) याठिकाणी 230 पैकी 163 जागा जिंकत विजय मिळवला. मध्यप्रदेशमधील या सरकारची वर्षपूर्ती गुरुवारी साजरी झाली. त्यावेळी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही 'लाडकी बहीण' योजना राबविणाऱ्या राज्यांना मोलाचा सल्ला दिला. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभव पत्करावा लागला होता. यावेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलासाठी 'लाडकी बहीण' योजना राबवली.

या योजनेमुळे महिला मतदार मोठ्या प्रमाणात महायुतीकडे वळल्या. त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला. महिलांच्या बँक खात्यात आर्थिक मदत पोहोचल्यानंतर महिलांनी भरभरुन महायुतीला मतदान केले. त्याचवेळी ही योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशातील भाजप सरकारने राबवली होती. या योजनेवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी सविस्तर भाष्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत आहे. ही योजना सुरु ठेवण्यासाठी आम्हाला येत्या काळात उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतील, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मध्य प्रदेशात वर्षभरापासून तुमचे सरकार सत्तेवर आले आहे, तेव्हापासून अनेकांनी लाडकी बहीण योजनेवरील खर्चावर बोट ठेवले आहे. त्यामुळे या योजनेचा सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे का ? असा प्रश्न मुख्यमंत्री यादव यांना विचारण्यात आला. त्यावर 'लाडली बहना' योजनेमुळे वित्तीय भार पडत आहे. हा मुद्दा बरोबर आहे, अशी स्पष्ट कबुलीच यादव यांनी दिली. त्यासोबतच 'सरकारी तिजोरीवर भार पडतोय. पण त्यासोबत सरकार उत्पन्नाची साधनंदेखील वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या काळात राज्यातील आर्थिक व्यवस्थेला स्वत:च्या पायावर उभे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेव्हा तुम्ही उत्पन्न वाढवता, तेव्हा तुम्ही स्वत:च अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था चालवण्यासाठी समर्थ आणि सक्षम होता. या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही सुरु केलेल्या सगळ्या जनकल्याणकारी योजना सुरुच राहतील,' असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करीत त्यांच्याप्रमाणे लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या राज्यांना त्यांनी मोलाचा सल्ला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT