Pankaja Munde : पंकजा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या, 'विधानसभेच्या तीनही निवडणुकीत पक्षाचे काम केलंय...'

Pankaja Munde Role in Cabinet : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठे विधान करतानाच आगामी काळात होत असलेल्या मंत्रीमंडळ विस्तार व मंत्रिपदाबाबत भूमिका मांडली.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महायुतीच्या सरकारचा शपथविधी होऊन आता आठवडा पूर्ण झाला आहे. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार अद्याप झालेला नाही. आता हा विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार असल्याची चर्चा सर्वत्र जोरात सुरु आहे.

महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांच्यात खाते वाटपावर चर्चा पूर्ण झाली असली तरी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास दिरंगाई केली जात असल्याने सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठे विधान करतानाच आगामी काळात होत असलेल्या मंत्रीमंडळ विस्तार व मंत्रिपदाबाबत भूमिका मांडली.

दिवंगत भाजप (BJP) नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची गुरुवारी जयंती आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्याच्या आठवणी जागवल्या. तसेच, पत्रकारांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली. मुंडे साहेबांच्या माझ्या मनातील ज्या भावना आहेत, त्याबाबत मी सोशल माध्यमातून व्यक्त केले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Pankaja Munde
Dharamrao Baba Atram : गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी अजितदादांचा आमदार फडणवीसांना भिडणार?

यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबतची अधिकृत तारीख माहीत नाही, आणि कुणाचे नाव हेही माहित नसल्याचे स्पष्ट केले. त्याबाबत केंद्रीय नेतृत्व ठरविणार आहे. मी यापूर्वी 2014, 2019 आणि 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परिश्रम घेतले.

पक्षाने सांगितलेले काम मी केले आहे. त्यावेळी पीएम मोदीजींनी मला स्टार प्रचारक केले होते. पक्षाने जे काम मला दिले त्याची मी पूर्तता केली. हे यश माझं नाही तर भाजप कार्यकर्त्याचे आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाबाबत भूमिका मांडली.

Pankaja Munde
Uddhav Thackeray Video : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा फोन, नेमंक कारण काय?

मुंडे साहेबांना जाऊन अकरा वर्षे झाले तरी इतक्या मोठ्या संख्येने नागरिक आजही येतात, हे भाग्य असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वेगाने सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या दिल्लीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde
Ambadas Danve : राजकीय दबावात काम करु नका, अंबादास दानवेंनी घेतली बीड एसपींची भेट!

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला काही निरोप नाही पण निरोपाची वाट बघत नाही. साईबाबाच्या पावनभूमीत आम्हाला नेतृत्व करायची संधी आहे. प्रत्येक संधीचा लाभ सर्वसामान्य जनतेला होईल. सर्व वरिष्ठ नेत्याबद्दल आम्हाला विश्वास आहे, वरिष्ठ नेते आम्हाला न्याय देतील, अशी आमची अपेक्षा आहे, असे म्हणत त्यांनी देखील मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली.

Pankaja Munde
Abu Salem : अबू सालेमला 25 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार; लवकर सुटका करण्यास टाडा कोर्टाचा नकार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com