
Mumbai News: देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडीचे नेते या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. तर, फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देखील शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी फोन केला होता.
उद्धव ठाकरे हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाकरेंनी फोन करून फडणवीसांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या विषयीचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे भाजपसोबत कधीच जाणार नाही, असे देखील ठाकरेंनी ठणकावून सांगितले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप होत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित राहिले नसल्याची चर्चा होती.
उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थित राहिले नसले तरी दुसऱ्या दिवशी त्यांनी फडणवीसांना फोन करून शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांनी देखील सांगितले की त्यांना फडणवीस यांनी फोन करून शपथविधीचे निमंत्रण दिले होते. मात्र, संसदेचे सत्र सुरू असल्याने ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका उद्धव ठाकरे जिंकणार की नाही याविषची तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.