Mumbai News : राज्यात आगामी काळात बारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या ठिकणाची लढत बिनविरोध होणार की निवडणूक होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या दोन्ही जागेसाठी महायुतीचे उमेदवार ठरले आहेत. मात्र, महाविकास आघाडीत या दोन्ही जागा कोण लढविणार यावरून एकमत होत नसल्याने एकीकडे सस्पेन्स कायम आहे. या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली असली तरी याठिकाणी आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांनी बसून याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने धाकधूक वाढली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा (Sharad Pawar) पक्ष निवडणूक लढणार नाही पण त्या ठिकाणी जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राहुरी आणि बारामती मध्ये आता पोट निवडणूक आहेत आमचा प्रयत्न आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच निर्णय घेतला पाहिजे, राहुरीमध्ये याआधी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्ता तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीने लढली होती आता मला नक्की माहिती नाही पण त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अधिकार आहे.
राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाची ताकद असल्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांनी बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही पण त्या ठिकाणी जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा संदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील आणि तो घ्यावा लागेल. राहुरी मध्ये लढण्याची आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण भाजपला मदत होईल, अशी भूमिका कुणी घेऊ नये असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे. काँग्रेस पक्षाच्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, स्थानिक पातळीवरील समीकरणांचा आढावा घेण्यात आला. इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्ष नेतृत्व योग्य उमेदवार निवडण्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राहुरी, बारामती दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे बारामती आणि राहुरीतील राजकीय लढती अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक
बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झाले. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.