बीड : 'सुरेश धस यांनी बीडची बदनामी केली',अशी टीका राज्याच्या पर्यावरण मंत्री (Pankaja Munde) पकंजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना केली. या टीकेला सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पंकजा मुंडे यांच्या आरोपाला उत्तर दिले. पंकजा यांच्या विधानाचा दाखला देत दमानिया यांनी 'एक्स'वर प्रतिक्रिया दिली आहे.
'पंकजा मुंडे ताई तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याचे मी स्वागत करते. (Anjali Damania) तुमच्या मतदार संघात झालेल्या इतक्या क्रूर हत्येबद्दल तुम्ही खरतर रोज बोलायला हवं होतं,त्या कुटुंबाच्या घरी जायला हवं होतं. जन आक्रोश मोर्च्यात सहभागी व्हायला हवं होतं. पण तुम्ही ह्यातलं काहीच केलं नाही. बीड बदनाम आपोआप नाही होत,तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं आहे, तुमच्या दहशतीने केलं आहे.
धस पण त्यातलेच एक आहेत. तुम्ही म्हणता तुम्ही बीड मध्येच राहता आणि तुम्ही एक महिला देखील आहात.पण तुम्ही हे विसरता की हे गुंड तुमचेच आहेत आणि तुम्हाला सुरक्षा आहे,सामान्य जनतेला नाही. तुमच्या गुंडांची दहशत त्या सामान्य जनतेला भोगावी लागते'अशा शब्दात अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
पुणे, नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी वाईट घटना घडतायेतं हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगले नाही. बीडमधील घटनांबद्दल आता जे बोलतायेतं, ते दोन अडीच वर्ष गप्प का होते? त्यांच्यामुळेच बीड बदनाम होतयं, अशा शब्दात राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सर्वात पहिल्यांदा आपण एसआयटी चौकशीची मागणी केली होती,असेही त्या म्हणाल्या. पुण्यात तरुणीला झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत वाईट घटना घडली,हे सगळीकडे घडतंय अशा घटना राज्यात सगळीकडे घडत आहेत. कुठलीही घटना होते भांडण किंवा खून होतो त्यावर ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.
धस यांच्या आरोपांबद्दल मला विचारले जाते, त्यावर मी काय बोलू? माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही? त्यांच्यामुळे बीड बदनाम झाले आहे.राजकीय भूमिका न घेता विषय संवेदनशील रितीने समजून घेतला असता तर बीड बदनाम झाले नसते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
आमच्या जिल्ह्यात लोक स्वाभिमानी आहेत, मी महिला राजकारणी म्हणून तिथे काम करते.सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यातील आहेत. आम्ही काम करतो नाहीतर दरोडे करायला गेलो असतो ना, असेही पंकजा म्हणाल्या. माझ्याकडे नागपूर, पुण्यासह सर्व जिल्ह्यांची माहिती आहे, असे सांगत बीडला बदनाम केलं जात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.