BJP  Sarkarnama
महाराष्ट्र

BJP leader quits party : महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

BJP big jolt before municipal elections News : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून भाजपच्या मित्रपक्षात प्रवेश करण्यासाठी रांग लागली होती. मात्र, आता वातावरण बदलण्यास सुरवात झाली असून राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे,

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरच राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वीच मोठे पक्षांतर सुरु झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून भाजपच्या मित्रपक्षात प्रवेश करण्यासाठी रांग लागली होती. मात्र, आता वातावरण बदलण्यास सुरवात झाली असून राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे, भाजपच्या बड्या नेत्याने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाची साथ सोडली आहे.

दिवाळीनंतर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हालचालींना वेग आला आहे. एकीकडे शुक्रवारी दुपारीच राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण देखील जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षासोबतच उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीचे देखील आरक्षण जाहीर झाले आहे. त्यातच आता मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर देखील मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झाले आहे. महाविकास आघाडीमधील नेते महायुतीमध्ये प्रवेश करतच आहेत, मात्र आता महायुतीमधील घटक पक्षातील नेते देखील दुसऱ्या घटक पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

मीरा-भाईंदरमधील भाजप (BJP) कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला. मनोज राणे हे मंत्री नितेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. हा भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे.

मनोज राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे मीरा-भाईंदरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकत वाढली आहे. शिवसेना (Shivsena) नेते प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकासाचा अजेंडा घेऊन शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज राणे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT