Beed Murder Case News Sarkarnama
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Murder Case : बीड सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट; उद्या सकाळी मुख्यमंत्री सभागृहात करणार 'ही' घोषणा

Beed Crime News : संतोष देशमुख यांना बेदम मारहाण झाल्याचे पुढे आले आहे. त्यातच आता या प्रकरणात अपडेट समोर येत असून शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी सभागृहात मोठी घोषणा करणार आहेत.

Sachin Waghmare

Nagpur News : नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गुरुवारी अधिवेशनाचा चौथा दिवस असून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभेत या मुद्द्यावरुन विरोधकांनी घणाघाती भाषणे करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. अशातच आता संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांना बेदम मारहाण झाल्याचे पुढे आले आहे. त्यातच आता या प्रकरणात अपडेट समोर येत असून शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी सभागृहात मोठी घोषणा करणार आहेत. (Santosh Deshmukh Murder Case)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजणाऱ्या बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी राज्यातल्या सगळ्या वसुलीबाजांवर कारवाई करण्यात येईल. त्यासोबचतच सगळ्या वसुलीबाजांवर कारवाई केल्यास महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील आणि राज्याचा विकास होईल, असेही फडणवीस म्हणाले.

या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ पातळीवर होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीआयडीचे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी 11 वाजता विधानसभेत सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचे समजते.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वरिष्ठस्तरावरून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी कोणते अधिकारी तपास करतील यावर गृहविभागाकडून निर्णय होणार आहे. तसेच या तपासाची कार्यकक्षा काय असणार हेदेखील गृह विभाग ठरवणार असल्याचे समजते.

दरम्यान, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भाजपचे (Bjp) आमदार सुरेश धस, नमिता मुंडदा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत आवाजा उठवला होता. त्याचसोबत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि रजनी पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली होती. तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यानी संसदेत यावर आवाज उठवला होता.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टेम अहवालात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या अंगावर एकूण 56 जखमा आढळून आल्या आहेत. त्यांच्या डोळ्यांच्या भागात मारहाण करण्यात आली आहे. मात्र, ते जाळण्यात आलेले नाहीत. संतोष देशमुख यांच्या पाठीवर सर्वाधिक मुका मार बसल्याचे दिसत असल्याचे अहवालात पुढे आले आहे. त्यावरूनच सभागृहात विरोधकांनी धारेवर धरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT