Chhagan Bhujbal : भुजबळांच्या पुनर्वसनासाठी नवा प्लॅन तयार; राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारणार का ?

Chhagan Bhujbal Political Future : मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांच्याकडून एक नवा प्रस्ताव भुजबळ यांना पाठविण्यात आला आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच राज्य मंत्रीमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात न आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

दुसरीकडे माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांच्याकडून एक नवा प्रस्ताव भुजबळ यांना पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता भुजबळ स्वीकारणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्यातील ओबीसी समाजाचे नेते आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांची नाराजी पक्षासाठी अडचणीची ठरणार असल्याने त्यांची नाराजी दुर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Video : फडणवीसांच्या संकटमोचकाचे मोठे विधान, म्हणाले 'छगन भुजबळ यांची नाराजी परवडणार नाही'

छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच टीका केली. आपला अपमान झाल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व त्यानंतर नितीन पाटील यांना राज्यसभेत पाठविण्यात आले होते.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी पुढची दिशा ठरवली ? म्हणाले, 'या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार'

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुजबळांच्या इच्छेप्रमाणे त्यांना राज्यसभेत पाठविण्यासाठी हालचाली सुरु असल्याचे समजते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितला जाऊ शकतो, असे समजते. पाटील यांची अद्यापही चार वर्षांची राज्यसभेची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे भुजबळ यांना उर्वरित राज्यसभेची मुदत म्हणजे चार वर्षांपेक्षा कमी कालावधी मिळणार आहे.

Chhagan Bhujbal
Congress vs BJP : शहांच्या ‘त्या’ विधानाने बिघडवला खेळ; विरोधक आक्रमक, मोदी का उतरले मैदानात?

दुसरीकडे भुजबळ यांची राज्यसभेत निवड झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या येवला विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा नवा प्रस्ताव तयार आहे. समीर भुजबळ यांना निवडून आणण्यासाठी सर्व महायुतीचे नेते प्रयत्न करतील, असा दावा करण्यात आला आहे. हा प्रस्ताव छगन भुजबळांना पाठविण्यात आला असल्याचे समजते मात्र अद्यापही त्यांनी हा स्वीकारलेला नसल्याचे समजते. राष्ट्रवादीकडून तसा प्रस्ताव आल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रस्तावावर भुजबळ काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal
Bjp News : फडणवीसांच्या लाडक्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, 'नाराज नाही, पण..'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com