Raj Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि आमदारही फुटायला सुरुवात झाली आहे. नुकतेच या लॉटमध्ये सचिन अहिर हे शिंदेंच्या शिवसेनेसमोर नतमस्तक झाले आहेत. त्याचं फळ म्हणून त्यांना विधानपरिषदेच्या उपसभापतीपद मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडीवर भाष्य केलं आहे. भाजपला हे महागात पडणार असून हा ग्लोबल इफेक्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कुठपर्यंत जायचं याला काही मर्यादा आहेत की नाही. ज्यावेळी आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या विरोधकांना संपवलं आहे. तेव्हा त्यांच्यातच त्यांचे विरोधक आणि दुश्मन तयार झाले आहेत आणि त्यांनी त्यांना संपवलं आहे. ही प्रक्रिया भारती जनता पक्षात सुरु झालेली आहे. त्यामुळं बाहेरचे विरोधीपक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, पण आता तुमच्यात जे विरोधक तयार झाले आहेत त्याचा तुम्हाला जो त्रास होईल ते आता तुम्हीही पाहत राहा. हा जगाचा इतिहास आहे. आणिबाणीच्या काळातही हेच झालं होतं, अनेकवेळेला याच गोष्टी घडलेल्या आहेत.
कथित ऑपरेशन टायगर अन् सचिन अहिर यांच्या सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, प्रश्न हा विकत घेणाऱ्यांचा नाही तर विकल्या जाणाऱ्यांचा आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी नुकताच भाजपतील रस्सीखेच यावर भाष्य करताना राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर भाष्य करताना अमित शहा यांचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री किंवा केंद्रातील एकही नेता यावर बोलायला तयार नाही. का अयोध्येत ऐवढा आटापिटा करून निवडणुकीच्या तोंडावर (उद्घाटन) करून देखील ना अयोध्येत ना देशात कुठेच फायदा झाला नाही म्हणून याकडे दुर्लक्ष? अर्थात नेहमी प्रमाणे यात पण शहा-काटशहा यांचं राजकारण सुरु आहेच! उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेस हा मुद्दा स्वपक्षातले योगींचे विरोधक नक्की उचलतील.
मग यातून योगी आदित्यनाथ यांची आपोआपच कोंडी होईल, झालंच तर त्यांचं काहीसं नुकसान होईल आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्वकांक्षाना आपोआपच खीळ बसेल. ही एक शक्यता जरी असली तरी सध्या भारतीय जनता पक्षात 'पुढे कोण' यावरून जो सुप्त संघर्ष सुरु आहे, त्याचे पडसाद कुठेही उमटताना दिसू शकतात. अगदी खासदार, आमदार फोडाफोडीपासून ते मंदिरांपर्यंत! देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या विरोधी पक्षांची घरं कशी फोडता येतील आणि लवकरात लवकर आपल्याला पंतप्रधानाच्या खुर्चीत कसं विराजमान होता येईल याची धुरकट स्वप्न पाहत बसलेत म्हणून रामाच्या गृहात काय घडतंय याला त्यांच्या लेखी काही किंमत असण्याचे कारणच नाही!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.