Sachin Ahir: सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड! मविआच्या उमेदवारांनं अर्ज घेतला मागे

Sachin Ahir: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधीपक्षाचे उमेदवार यांनी सभागृहाची परंपरा राखत आपला अर्ज मागे घेतला त्यामुळं अहिर यांची एकमतानं निवड झाली.
Sachin Ahir video creates political buzz in Maharashtra
Sachin Ahir video creates political buzz in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Sachin Ahir: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधीपक्षाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यांकर यांनी सभागृहाची परंपरा राखत आपला अर्ज मागे घेतला त्यामुळं अहिर यांची एकमतानं निवड झाली. यापूर्वी नीलम गोऱ्हे या पदावर कार्यरत होत्या. पण यंदा शिवसेनेकडून सचिन अहिर यांना संधी देण्यात आली आहे. अहिर हे कालपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत होते पण अचानक त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळं बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु होत्या.

Sachin Ahir video creates political buzz in Maharashtra
VB-GRAMG: 'मनरेगा' आजपासून बंद, 'जीरामजी' सुरु; दिवसाला ४५० रुपये मजुरी अन्...; सर्व राज्यांचं 'रेट कार्ड' पाहा

विधान परिषदेचं बलाबल कसं?

विधानपरिषदेत उपसभापती निवडणुकीसाठी दुपारी १ वाजता सभागृहात निवडणूक पार पडणार होती. पण तत्पूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यांकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध झाली. तसंही महाविकास आघाडीकडं या निवडणुकीसाठी पुरेसं संख्याबळ नसल्यानं सचिन अहिर यांचा विजय निश्चित मानला जात होता. विधान परिषदेत महायुती आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ पहिल्यास भाजपा (३५), शिवसेना (१२), राष्ट्रवादी (१०), शिवसेना (उबाठा) (५), काँग्रेस (५), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (२) असं आहे. म्हणजेच महायुतीकडं ५७ इतके आमदार आहेत. तर महाविकास आघाडीकडं १२ आमदार आहेत.

Sachin Ahir video creates political buzz in Maharashtra
Pune: नेते सोडून गेले तरी निष्ठावंत पाठीशी! पुण्यातील 130 ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी वसंत मोरेंकडून 'मातोश्री दर्शन' मोहीम

अहिर यांची राजकीय कारकीर्द

सचिन अहिर हे पहिल्यांदा १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून झाले होते. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. २००९ मध्ये त्यांच्याकडं गृहराज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. या दोन्ही काळात त्यांनी वरळी मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदे यांच्याकडून त्यांचा वरळीत पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्ये आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. २०२० मध्ये त्यांना शिवसेनेत उपनेतेपद देण्यात आलं. त्यानंतर २०२१ मध्ये ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील झाले. अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठान तर्फे घेण्यात येणारे वरळी फेस्टिवल आणि दहीहंडी उत्सव प्रसिद्ध आहेत.

Sachin Ahir video creates political buzz in Maharashtra
Pune: नेते सोडून गेले तरी निष्ठावंत पाठीशी! पुण्यातील 130 ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी वसंत मोरेंकडून 'मातोश्री दर्शन' मोहीम

दरम्यान, शिवसेनेतल्या फुटीनंतर कालपर्यंत सचिन अहिर हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ होते. आदित्य ठाकरेंसोबत कायम सावलीसारखे असणारे अहिर हे अचानक शिंदेसोबत गेल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण ते एकटेच शिंदेंसोबत गेल्यानं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल का? अशी चर्चा देखील सुरु झाली होती. पण त्यांना अपात्रतेचा नियम लागू होत नसल्याचं समोर आलं. कारण लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा सभापती, उपसभापती तसंच राज्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच विधानपरिषदांमध्ये सभापती, उपसभापतीपदी जर एखाद्या लोकप्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली आणि त्यासाठी त्या व्यक्तीनं आपलं पद सोडलं आणि पुन्हा त्यानं उपल्या मूळ पक्षात प्रवेश केला तरी त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com