Vinod Tawde | Devendra Fadnavis | Sushama Andhare  sarkarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare : 'भाजपच्या 'नोट जिहाद'ने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला'; सुषमा अंधारेंचे जिव्हारी लागणारे ट्विट

Sushma Andhare mocks BJP’s 'Note Jihad' with Tawde reference: विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये हा राडा झाला होता. आचारसंहितेचा भंग गेल्याच्या कारणावरून विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा येथील उमेदवार राजन नाईक यांना हॉटलमध्ये बाविआच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी घेरले. यावेळी भाजप व बविआच्या कार्यकर्त्याच्या दोन्ही गटात तुफान राडा झाला. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये हा राडा झाला होता.

आचारसंहितेचा भंग गेल्याच्या कारणावरून विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना त्यातच विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये हा राडा झाला होता. त्यामध्ये भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तावडे हे पाच कोटी रुपये वाटण्यासाठी आल्याचा आरोप बविआने केला. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केले जात असतानाच शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक ट्विट करीत भाजपच्या नेत्यांची कोंडी केली आहे.

शिवसेना उबाठा गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे अडचणीत सापडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक खोचक ट्विट केले आहे. भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला...! पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं...!! देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? ’अशी खोचक टीका करत अंधारे यांनी फडणवीस यांना टोला लगावला.

येत्या काळात या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केले जाणार असल्याने ऐन निवडणुकीपूर्वी राज्यातील वातावरण या घटनेनंतर चँगलेच तापणार आहे. त्यामुळे या सर्व घटना घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT