Uddhav Thackeray | Devendra Fadnavis  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra politics : मातोश्रीवरील ठाकरेंच्या खासदारांची बैठक संपताच सीएम फडणवीसांचा थेट वार; मोजक्या शब्दांतच लगावला टोला!

Devendra Fadnavis News : ठाकरेंच्या खासदारांची बैठक संपताच पत्रकारांनी सीएम देवेंद्र फडणवीस यांची त्यावर प्रतिक्रिया घेतली. यावर फडणवीस यांनी थेट वार करीत मोजक्या शब्दांतच उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात विधानपरिषेदेची निवडणूक होत असतानाच वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे राज्यातील उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेला उधाण आल्यानंतर या चर्चाना पूर्णविराम देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. ही ठाकरेंच्या खासदारांची बैठक संपताच पत्रकारांनी सीएम देवेंद्र फडणवीस यांची त्यावर प्रतिक्रिया घेतली. यावर फडणवीस यांनी थेट वार करीत मोजक्या शब्दांतच उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

गेल्या चार दिवसापासून राज्यात शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची चर्चा केली जात आहे. त्यामुळेच दोन्ही शिवसेनेचे नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अलर्ट मोडवर येत मातोश्रीवर पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली होती. परंतु, या बैठकीस नऊपैकी चार खासदार प्रत्यक्षात हजर होते तर पाच जण ऑनलाइन हजर होते,असे माहिती मिळते.

त्यावर काही पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadanavis) यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, खासदार अनुपस्थित आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावरती बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मला त्याची काही कल्पना नाही. कोण येणार आहे. कोण जाणार आहे. आता बैठक झाली की कोण कोण होते हे मला तुम्हीच सांगा, कोण नव्हते ते देखील मला सांगा म्हणजे मलाही कळेल, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

एकीकडे आपण पाहत असाल तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) ज्या बैठका होतात, तिकडे खासदार अनुपस्थित राहतात. दुसरीकडे आपल्या प्रदेश अध्यक्षाचा दौरा सुरू आहे, त्याठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतात, त्यावर फडणवीस म्हणाले, 'प्रेम आहे, ते फक्त प्रेम आहे, दुसरे काही नाही प्रेम आहे.'

दरम्यान, राज्यात लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबविले जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला असल्याने या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक मातोश्री निवासस्थानी बोलवली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ पैकी चार खासदार उपस्थित होते. तर अन्य पाच खासदार या बैठकीस ऑनलाइन उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी या बैठकीनंतर दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT