eknath shinde and devendra fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

CM Fadnavis warns Shinde MLA: शिंदेंच्या आमदारावर सीएम फडणवीसांचा संताप; थेट कारवाईचा इशारा; नेमकं कारण काय?

Fadnavis angry on Shinde MLA News : एकनाथ शिंदेंच्या आमदारावर सीएम देवेंद्र फडणवीस प्रथमच संतापले आहेत. पोलिसांच्या बाबतीत केलेले विधान त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात सध्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षाची सत्ता आहे. चार महिन्यापूर्वी सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमधील तीन पक्षात कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद दिसून येतात. सुरुवातीला मंत्री पदावरून तर त्यानंतर मलईदार खात्यावरून तीन पक्षात रस्सीखेच पाहवयास मिळाली तर त्यानंतर नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरु असलेला वादावर अजून तोडगा निघालेला नाही.

या ना त्या कारणावरून महायुतीमध्ये नेहमीच नाराजीनाट्य रंगलेले दिसते. त्यातच आता एकनाथ शिंदेंच्या आमदारावर सीएम देवेंद्र फडणवीस प्रथमच संतापले आहेत. पोलिसांच्या बाबतीत केलेले विधान त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आमदाराला सज्जड दमच भरला असून पुन्हा असे विधान केल्यास थेट कारवाईचे संकेत दिले आहेत.

अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर निधी मंजुरीच्या मुद्द्यावरून तर या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा जुंपल्याचे समोर आले आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले आहेत. आमदार गायकवाड यांना भविष्यात अशास्वरुपाची विधाने केली तर थेट कारवाईच करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड यांनी राज्यातील पोलिसांवर पातळी सोडून टीका केली आहे. “अरे महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खाते फक्त भारतातच नव्हे तर जगात कुठेही नाही. शासानाने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला की, त्याचा एक हफ्ता वाढतो. सरकारने गुटखाबंदी केली की पोलिसांचा हफ्ता वाढतो. दारू बंद केली की सुरु ठेवण्यासाठी पोलिसांचा हफ्ता वाढतो,' अशी खरमरीत टीका आमदार गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत.

आमदार गायकवाड यांनी केलेल्या विधानाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माध्यम प्रतिनिधीनी विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, 'पोलिसांबद्दल अशास्वरूपाचे मत व्यक्त करणे योग्य नाही. याबाबत मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. आमदार गायकवाड यांना कडक समज देण्यास सांगणार आहे. ते जर वारंवार असेच बोलणार असतील तर त्यावर कडक कारवाई केली जाईल.'

सल्ला दिलेला व्हिडिओ सगळीकडे व्हायरल

त्याच वेळी आमदार गायकवाड यांनी पोलिसांना सल्ला दिलेला व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातील पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केले की या जगातील सगळीच गुन्हेगारी कमी होऊ शकते. यांनी फक्त 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या उक्तीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करावे, असा सल्लाही त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी त्यांच्या या विधानाचे स्वागत केले आहे तर काही जणांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे कशा प्रकारे समज देणार?

शिवसेना आमदार संजय गायकवाड नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करीत असतात. यापूर्वी त्यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने करीत वाद ओढवून घेतले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा वाचाळवीर अशीच झाली आहे. त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे आमदार गायकवाड यांना कशा प्रकारे समज देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT