Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर निवडणूक पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद, मग उपमुख्यमंत्रीपद, नंतर मंत्रीपदांचे वाटप आणि शेवटी खातेवाटप या बाबी टप्प्याटप्प्याने चर्चेत राहिल्या. यासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांत चुरस दिसून आली. खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी या संदर्भात केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेला उधाण आले आहे. हे ट्विट धनंजय मुंडेंसाठी धक्का देणारे मानले जात आहे. (Ncp News)
बीडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp) मोठी चुरस पहावयास मिळत आहे. या शर्यतीमध्ये भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव देखील आघाडीवर आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे बीडचे पालकमंत्री होणार का याची उत्सुकता लागली आहे. मात्र, आता पंकजा मुंडे यांच्याकडे देखील मंत्रिपद असल्यामुळे बीडचा नवा पालकमंत्री कोण ? याबाबत महायुतीमधील दोन घटक पक्षांत चुरस पाहावयास मिळत आहे.
त्यातच आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे. ‘दादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होता त्यावेळी कोयतागँगचा बंदोबस्त करुन कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे हे सिद्ध करुन दाखवले. यावेळी पुणे जिल्ह्यासोबत बीड व परभणी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारा जेणेकरून परत संतोष देशमुख प्रकरण या राज्यात होणार नाही’ असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. या मिटकरी यांच्या ट्विटमुळे येत्या काळात धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अमोल मिटकरी यांनी केलेले हे ट्विट मंत्री धनंजय मुंडेंसाठी धक्का मानले जात आहे. बीडचे पालकमंत्रिपद याहीवेळी धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, असे असताना देखील अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रिपद स्विकारावं अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता बीडचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार ? याबाबत उत्सुकता आहे.
गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असतानाच अशाप्रकारचे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले असल्याने त्या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवार बीडच्या पालकमंत्री पदावरून काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.