Shivsena-BJP Yuti  Sarkarnama
महाराष्ट्र

Dhule municipal elections : निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून एक कोटीची ऑफर? शिंदेंच्या शिलेदाराने फोडला बॉम्ब!

Shiv Sena Shinde faction News : धुळ्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून एक कोटीची ऑफर दिली असल्याचा दावा करीत निवडणुकीच्या तोंडावरच बॉम्ब फोडला आहे.

सरकारनामा ब्युरो

Dhule News : राज्यभरात 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोंहचली आहे. त्यातच या निवडणुकीत 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी मंडळींवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असतानाच आता धुळ्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून एक कोटीची ऑफर दिली असल्याचा दावा करीत निवडणुकीच्या तोंडावरच बॉम्ब फोडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष बऱ्याच ठिकाणी एकमेकांविरोधात लढत आहेत. त्यामुळे या महापालिका निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. धुळ्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय वाल्हे यांना भाजपने पैशांची ऑफर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आता विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना महत्त्व प्राप्त झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय वाल्हे यांनी भाजपकडून पैशाची ऑफर आली असल्याचा आरोप केला आहे.

धुळे महापालिकका निवडणुकीत महायुतीमधील भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत लढत होत आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून शिंदे यांच्या सेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या पत्नी सविता वाल्हे या निवडणुकीला उभ्या आहेत. वाल्हे यांच्या पत्नीने निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपकडून 1 कोटी देण्याची ऑफर दिली होती. परंतु ही ऑफर आपण नाकारल्याचा दावा वाल्हे यांनी केला आहे.

याबाबत संजय वाल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात संजय वाल्हे यांनी माझी पत्नी सविता वाल्हे हिने प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीच्या ऑफर दिली असल्याचा दावा केला आहे. धुळे शहरात भाजपकडून निवडणूक होऊ नये, यासाठी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी ऑफर देत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी 1.45 च्या सुमारास 2 जण माझ्याकडे आले. माझ्या पत्नीच्या विरोधात जे भाजपचे उमेदवार आहेत, त्यांना बिनविरोध करण्यासाठी आपण1 कोटी घ्यावेत. ही निवडणूक बिनविरोध करावी, असे सांगितले, असे संजय वाल्हे म्हणाले. परंतु आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात काम करतो. शिवसेना कधीही पैशांसाठी काम करत नाही. या प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेचा आशीर्वाद सविता वाल्हे यांच्या मागे आहे. त्यामुळे आपण 1 कोटींची ऑफर नाकारली असल्याचे वाल्हे म्हणाले. धुळे येथे घडलेल्या या सर्व प्रकारामुळे आता राज्यभरातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT