Mumbai News : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष प्रचारात मग्न असताना राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि यांची भेट झाली. या भेटीचा तपशील समोर आला नाही. ऐन निवडणूक काळात झालेल्या या भेटीबाबत सस्पेन्स कायम असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मुंबईतील ग्रँड हॉटेलमध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी अचानक भेट झाली. हॉटेल ग्रँड हयातमध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात या दोन नेत्यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटो सध्या समोर आला आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांसमोर दिसत आहेत. यावेळी अचानक समोर आल्याने एकमेकांशी हस्तांदोलन केले. तर दोघांमध्ये एकमेकांच्या तब्येतीविषयी चर्चा झाली असल्याचे समजते.
गुरुवारी हॉटेल ग्रँड हयातमध्ये संजय राऊत यांची मुलाखत अगोदर पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा कार्यक्रम होता. त्याचवेळी संजय राऊत हे मुलाखतीचा कार्यक्रम आटोपून बाहेर निघले असता त्याचवेळी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले. त्यावेळी ही औपचारिक भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी फार काही चर्चा झाली नाही. पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. एक ते दीड मिनिटे ते बोलत होते. त्यांच्यातील चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही.
या दोन नेत्यांच्या भेटीला राजकारणातील एक सुखद चित्र म्हणावे लागेल. या भेटीनंतर दोन्ही नेते त्यांच्या कामासाठी निघून गेले. पण या भेटीची समाजमाध्यमांसह सर्वत्र चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर विखारी टीका सुरू असताना या भेटीमुळे राजकारणाचा एक आशादायी चेहराही समोर आणला आहे. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो, हे मात्र सिद्ध झाले आहे.
एकीकडे राज्यभरातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभामधून नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिपणी करीत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. तर सत्ताधारी व विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असताना या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.