Nanded Shivsena: ऐन महापालिका निवडणुकीतच शिवसेनेमध्ये भडका! संपर्क प्रमुखांसमोरच आमदार हेमंत पाटलांना शिवसैनिकांनी वाहिली शिव्यांची लाखोली

Shivsena News: नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.
Hemant Patil
Hemant Patil
Published on
Updated on

Nanded Politics News: नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या मीनल पाटील यांना आमदार हेमंत पाटील, बाबुराव कदम यांनी प्रचाराचा नारळ फोडत सभाही घेतल्या. यामुळं बालाजी कल्याणकर आणि त्यांचे समर्थक कमालीचे संतापले आहेत.

Hemant Patil
Eknath Shinde: नाराज झाले की गावाला अन् दिल्लीला का जातात? एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घानासाठी आलेल्या संपर्क प्रमुखांसमोरच शिवसैनिकांच्या संतापाचा भडका उडाला. बालाजी कल्याणकरांच्या उमेदवारांविरोधात पक्षाचेच आमदार काम करत असल्याचा आरोप करत हेमंत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी शिव्यांची लाखोली वाहिली. बालाजी कल्याणकर यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबायचं नाव घेत नव्हते. तिकडे शिवसैनिकावर अन्याय झाला असेल तर त्यांच्या पाठीशी उभे राहिला पाहिजे, त्याचा प्रचार आम्ही करणार अशी भूमिका हेमंत पाटील, बाबुराव कदम यांनी घेतली आहे.

Hemant Patil
Ashish Shelar: महापालिका निवडणुकीच्या दणदणाटात महायुतीला हादरे! 'सावरकर विचार'वरुन भाजप-राष्ट्रवादीत घमासान

एकूणच नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेमध्ये हे महाभारत घडत असल्याने आता यात वरिष्ठ नेत्यांनाच हस्तक्षेप करावा लागणार असे दिसते. दरम्यान, बालाजी कल्याणकर यांनी याआधीच हेमंत पाटील, बाबुराव कदम यांच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. उमेदवारी कोणाला द्यायची, कोणाला नाही? याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला आहे. उमेदवारांचे बी फॉर्म देखील जिल्हाप्रमुखांकडे आले होते.

Hemant Patil
Devendra Fadnavis: CM फडणवीस पुण्यात निर्माण करणार पाताळलोक! नेमका प्लॅन काय? प्रचार सभेत मांडला महत्वाचा मुद्दा

पक्षाने एकदा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करणे अत्यंत चुकीचे आहे. याबद्दल आपण कोणाकडेही तक्रार करणार नाही, सोशल मिडिया आणि चॅनलच्या माध्यमांपर्यंत हे सगळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचलेच असेल. मुळात आमदार हेमंत पाटील, हदगावचे आमदार बाबुराव कदम यांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. मी उद्या हदगावमध्ये जाऊन हस्तक्षेप केला तर त्यांना चालेल का? असा सवाल बालाजी कल्याणकर यांनी केला होता.

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली आहे. तर हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती केली आहे. आधीच यावरून भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला नियोजन शून्य ठरवत त्यांच्यावर टीक करतांना अशा लोकांच्या हातात सत्ता देणार का? असा सवाल केला होता. आता शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी या निमित्ताने आणखी उफाळून आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com