Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Warning : 'फडणवीसांच्या इशाऱ्यावर इतर पक्ष चालतात', शिंदेंच्या आमदाराने फोडला बॉम्ब! 2022 चा इतिहास सांगत भाजपला दिला थेट इशारा!

Shinde MLA Statement News : गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत वाद रंगला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या, महापालिकाच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत वाद रंगला आहे.

त्यातच भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजप (BJP) देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करीत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच भाजप व शिंदे सेनेचे नेते एकमेकांवर टीका टिपण्णी व आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर काही ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचे चित्र देखील नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. अशातच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात, असे वक्तव्य केले आहे.

लोढा यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला. मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकते. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो, असे गायकवाड म्हणाले. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा असल्याचे गायकवाड म्हणाले. आम्ही जी क्रांती केली त्यामुळे भाजप आणि महायुती सरकारमध्ये असल्याचे गायकवाड म्हणाले.

गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांच्या नेत्यांना गळाला लावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. लोढा यांच्या वक्तव्यावर संजय गायकवाड यांनी जोरदार टोला लगावला. त्यामुळे येत्या काळात आता संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा काय प्रतिक्रिया देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT