Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Bjp News : ठाकरेंच्या सेनेला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्वतंत्र जनाधार उरला नाही; इतरांच्या आंदोलनांचा आधार घेताहेत : भाजपच्या बड्या नेत्याची टीका

Girish Mahajan news : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर आंदोलन उभे करू शकत नाहीत.

Sachin Waghmare

Mumbai News : देशभरात केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा दिला जात असताना, या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर आंदोलन उभे करू शकत नाहीत. हे पक्ष मोठा गाजावाजा करतात, मात्र त्यांच्या आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्या मागे कार्यकर्तेही उरलेले नाहीत. त्यामुळे जिथे कुठे आंदोलन होतं, तिथे हे जाऊन सहभागी होतात, असा टोला भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.

दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या काही दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशभरातून विविध राजकीय पक्षांने पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांकडून राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर आंदोलन उभे करू शकत नाहीत. हे पक्ष मोठा गाजावाजा करतात, मात्र त्यांच्या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्या मागे कार्यकर्तेही उरलेले नाहीत. त्यामुळे जिथे कुठे आंदोलन होतं, तिथे हे जाऊन सहभागी होतात,” असा टोला महाजन यांनी लगावला.

विरोधी पक्षांकडे स्वतंत्र जनाधार उरलेला नसल्याने ते इतरांच्या आंदोलनांचा आधार घेत आहेत. स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकीय उपस्थिती दाखवण्यासाठी ते अशा आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोपही यावेळी माध्यमाशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून वाढता पाठिंबा मिळत असताना, त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT