Sunil Tatkare  Sarkarnama
कोकण

Sunil Tatkare : भाजप आणि आमच्यात उत्तम समन्वय! तटकरे म्हणाले, 'दोन दिवसात दिल्लीत पुन्हा बैठक...'

Allotment of seats in the Mahayuti : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरुन मतभेद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादी काही जागांवर आग्रही आहे, असेही बोलले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरुन मतभेद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादी काही जागांवर आग्रही आहे, असेही बोलले जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली आहे.

परवा दिल्लीत झालेली बैठक अत्यंत समन्वय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. या निर्धारातून आमची चर्चा झाली आहे. मित्रपक्ष खोटं पसरवत आहेत. आमच्यात कुठेही वेगळी भूमिका नाही, असे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले आहे. ते रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तटकरे म्हणाले, महायुतीमधील जागावाटप 80 ते 85 टक्के जागांवर पूर्ण झालेलं आहे. दोन दिवसांत पुन्हा एक बैठक होईल, त्यानंतर अंतिम निर्णय होईल. भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व अमित शहा (Amit Shah), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमच्यामध्ये समन्वय आहे. या भाजपच्या नेतृत्वाकडून मित्रपक्षाला सन्मानपूर्वक विश्वासात घेत चर्चा सुरू आहे. याबद्दल आपल्याला समाधान आहे. मित्रपक्ष खोटं पसरवत आहेत, आमच्यात कुठेही वेगळी भूमिका नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

जागा वाटपाबाबत छगन भुजबळ यांनी पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याबाबत तटकरे म्हणाले, ते महाराष्ट्रातील मोठे नेते असून 40-45 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पण आमच्यात समन्वय उत्तम आहे, आम्ही समन्वयातून महायुतीची पुढची वाटचाल करू असं तटकरे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी (NCP) नेमकी किती जागांसाठी आग्रही आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, राष्ट्रवादीबाबत जे काही पसरवलं जात आहे त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. काहीजण आमचे विरोधक जाणीवपूर्वक अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.

सुप्रियाताईंची उमेदवारी जाहीर होणं ही औपचारिकता होती. या जागेवर निवडणूक लढवावी असं आमच्या राष्ट्रवादीच्या सर्वांचं म्हणणं आहे. महायुतीच्या जागांचं वाटप झाल्यानंतर, ही जागा राष्ट्रवादीला मिळल्यावर सौ. सुनेत्राताई पवार याच आमच्या महायुतीच्या उमेदवार असतील, असेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कदाचित त्यांना वेगळं वाटलं असतं...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना शरद पवार गट आणि अजित पवार गट आतून एकच आहेत, मात्र बाहेरुन वेगळं दाखवत आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना तटकरे म्हणाले, ज्यावेळी राज साहेबांनी मनसे काढली. त्यावेळी कोणी असं म्हटलं असतं, ठाकरे परिवार एक आहे तर कदाचित त्यांना वेगळं वाटलं असतं.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT