Sanjay Raut : ...यामध्ये मोदी, शहांचा नवीन डाव! निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावरुन राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

ECI Commissioner Arun Goel Resign : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी आपला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी (ता. 9) तडकाफडकी आपला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. गोयल यांच्या अचानक राजीनाम्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Arun Goel) यांनी दिलेल्या राजीनाम्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. तर यामध्ये मोदी शहांचा नवीन डाव असेल, असा आरोप त्यांनी केला आहे. ज्याने नेमला त्यांनीच त्याला दूर केला त्या जागी अजून एक उपयुक्त व्यक्ती येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, या देशाला निवडणूक आयोगाची गरज नाही. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राज्यपाल म्हणून निवडले जातात, त्याचप्रमाणे निवडणूक आयुक्तांच्या जागी त्यांच्यातीलच कोणी निवडले जातील. निवडणूक आयोग हा तटस्थ आणि निपक्ष असतो तो संविधानानुसार काम करतो. पण गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाची शाखा असल्यासारखी काम करत आहेत.

Sanjay Raut
ECI Commissioner Arun Goel Resign : मोठी बातमी! निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा तडकाफडकी राजीनामा

जर भारतीय जनता पक्ष ईव्हीएम बनवणाऱ्या भारतीय उपक्रमात संचालक म्हणून काम करू शकतात तर त्यांचे कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या दोन रिकाम्या जागी काम करतीलच. शेवटी निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वरिष्ठांच्या सूचनेनुसार नव्हे तर आदेशानुसारच काम करतो. हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

पक्षांतर बंदी विरोधी कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन झालं असताना, हाच निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसला. भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली त्यांनीच नेमलेली ही लोकं काम करतात. त्यामुळे निवडणूक आयोग असला काय आणि नसला काय या देशाला काही फरक पडत नाही.

ज्यांनी नेमला त्यांनीच त्याला दूर केला...

निवडणू आयुक्तांनी दिलेल्या राजीनाम्यावर राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली. ते म्हणाले, यामध्ये मोदी शहांचा नवीन डाव असेल. निवडणूक आयुक्तांनी दिलेला राजीनाम हा नैतिकतेच्या मुद्द्यावरून दिलेला नाहीये. अशावेळी राजीनामा जर कोणी नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला असेल, तर मी मान्य करतो. मुळात ती नेमणूकच अनैतिक होती. अनैतिक पद्धतीने झालेली नेमणूक नैतिक कारणासाठी राजीनामा कशी देईल, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर ज्याने नेमला त्यांनीच त्याला दूर केला. त्या जागी अजून एक उपयुक्त व्यक्ती येईल, असा टोला त्यांनी लगावला.

Sanjay Raut
Sunil Shelke News : "मला खासदार अन् माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं नाही, तुमचं...", शेळकेंचा सुळेंना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com