Mahad Political News : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आमदार भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरून राडा झाला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडल्याने परिसरात तणावाचं वातारण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
नागपूर अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session) काळात भरत गोगावले यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखतीत देताना ''बाळासाहेब ठाकरे आता वर गेलेत, त्यांचं मत जाणून घ्यायचं असेल, तर कोणालातरी वरती जावं लागेल.'' असे एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून हा राडा झाला आहे. हाच मुद्दा महाड (Mahad) येथील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या कार्यकर्त्यांना खटकला होता.
यातच ठाकरे गटाने गोगावले यांचा निषेध करण्याची तयारी केली होती. यातच ठाकरे गटाचे कार्यकर्ते महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. त्यावेळी हा राडा झाला. तब्बल दीड तास हा राडा सुरु होता. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुकी करत होते. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पुर्वसंधेला शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला होता. यावेळी ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
(Edited by Amol sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.