Rajan Salvi And Kiran Samant  Sarkarnama
कोकण

Kiran Samant On Rajan Salvi: एकनाथ शिंदेंचा सामंत बंधूंच्या वर्चस्वाला धक्का..? कडाडून विरोधानंतरही साळवींना शिवसेनेत 'एन्ट्री' दिलीच...!

Rajan Salvi Uday Samant Kiran Samant : माजी आमदार राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. पण राजन साळवींच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला कोकणातील सामंत बंधूनी कडाडून विरोध केला होता.

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील जबरदस्त यशामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना दोन्हीही सुसाट आहे.त्यामुळे शिदेंनी पक्षसंघटनेवर बळ दिलं असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमधील बडे नेते पक्षात आणण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. त्यातच बुधवारी (ता.12) शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर'ला यश आलं असून कोकणात ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवींनी (Rajan Salvi) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते गुरुवारी (ता.13) शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.

माजी आमदार राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. पण राजन साळवींच्या शिवसेनेतील (Shivsena) पक्षप्रवेशाला कोकणातील सामंत बंधूनी कडाडून विरोध केला होता. पण सामंत बंधूंच्या विरोधानंतरही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींना पक्षात प्रवेश दिला आहे.त्यामुळे शिंदेंनी साळवींसारख्या सामंत बंधूंच्या कट्टर राजकीय विरोधकाला पक्षात आणून मोठा डाव टाकला आहे. त्यांनी साळवींच्या पक्षप्रवेशामुळे सामंत बंधूच्या कोकणातील वर्चस्वालाच धक्का दिल्याची चर्चा आहे. आता त्याच आमदार किरण सामंतांनी आपल्या विरोधाची धार कमी केलीच शिवाय टीकेची तलवारही एका झटक्यात म्यान केली आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला होता. तसेच निवडणुकीच्या प्रचारावेळी एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप केले होते.त्यामुळे साळवींचा पक्षप्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंकडून काही महिने वेटिंगवर ठेवण्यात आल्याची चर्चा होती. पण आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला आमचा कोणताही विरोध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिला आहे. कोकणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. इन्कमटॅक्स विभागाच्या कारवाईनंतर देखील ठाकरेंना साथ देणार माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. ज्या किरण सामंतांनी साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध केला, आता त्यांनीच विरोधाची धार एका झटक्यात कमी केली .

राजन साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशाला आमचा कुठलाही विरोध नाही.कोकणात शत-प्रतिशत शिवसेना हे धोरण जाहीर केलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरपालिका, नगरपंचायत याठिकाणी आमच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आणायचे आहे. त्यामुळे आम्ही संघटना वाढवत आहोत.पाठीमागं काय घडलं,याच्याशी काही देणंघेणं नाही. राजन साळवी आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत.ते आजही कायम असल्याचंही सामंत म्हणाले.

परंतु,निवडणुकीत हार-जीत ही असतेच. पण त्यांच्याकडे मी काय शत्रू म्हणून बघितलं नव्हतं.ते माझे प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे ते पक्षात आल्यानं मला काहीच फरक पडणार नाही. त्यांच्या पक्षप्रवेशाला माझा बिल्कुल विरोध नव्हता,असंही आमदार किरण साळवींनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांनी राजन साळवी हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू असताना दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली होती. राजन साळवींना एकनाथ शिंदे प्रवेश देतील असं वाटत नाही, असं मोठं विधान किरण सामंतांनी केलं आहे. तर आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच एकनाथ शिंदे राजन साळवींना प्रवेश देतील असं सामंत म्हणालेत. त्यामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चेतच साळवींच्या नावाला विरोध सुरु असल्याचं एका अर्थानं दिसून येतंय.

यापूर्वी किरण सामंत नेमकं काय म्हणाले होते..?

राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत. परंतु, मला असं वाटत नाही. एकनाथ शिंदे हे त्यांना पटकन पक्षामध्ये घेतील किंवा विधान परिषदेची जागा देतील.ही पूर्णपणे अफवा आहे.असे निर्णय घेताना मला, उदय सामंत यांना एकनाथ शिंदे नक्कीच विचारात घेतील अशी मला खात्री असल्याचंही सामंत यांनी म्हटलं होतं.

उदय सामंत काय म्हणाले होते ?

सामंत बंधूंचा राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला आहे. त्याच्या जवळचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पक्षात आले आहे व येत आहे. त्यामुळे राजन साळवी यांना पक्षात घेतांना एकनाथ शिंदे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतील असे उदय सामंत म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT