Mahayuti Politics : पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील नाराजी नाट्या संपण्याचे नाव घेत नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांच्यातील दुरावा कायम आहे. दोघांचे खाते आरोग्याशी संबंधित असताना देखील त्या संबंधित कार्यक्रमाला आबिटकर अनुपस्थित राहिल्याने मुश्रीफ-आबिटकरांमधील नाराजी अजून कायम असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पुन्हा पालकमंत्री घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ इच्छुक होते. पण त्यांना कोल्हापूरऐवजी वाशिमचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याने त्यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली आहे.
सोमवारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विविध कक्षांचे लोकार्पण सोहळा मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यासाठी पालकमंत्री आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची आमंत्रित केले होते. पण आबिटकर सोमवारी दिवसभर जिल्ह्यातच होते पण ह्या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. सायंकाळी ते कोल्हापुरात आले.
यावरून या जिल्ह्यातील दोन मंत्र्यांतच पालकमंत्री पदावरून दुरावा निर्माण झाला की काय, अशी चर्चा सुरू आहे. इतकेच नव्हे तर काही आमदार खासदार यांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कोल्हापुरात असूनही पालकमंत्री आबिटकर यांच्यासह महायुतीतील आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून सुरू झालेले रसवे फुगवे आजही कायम असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात महायुतीला दहाही जागांवर यश मिळाले असताना दहा जणांचे तोंडे दहा दिशेला असल्यासारखी परिस्थिती आहे. मंत्रीपद नाकारल्याने पहिल्या दिवसांपासून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर नाराज आहेत. एवढेच नव्हे, तर आतापर्यंत त्यांनी त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री असलेल्या प्रकाश आबिटकर यांचे अभिनंदन करण्याचेही टाळले आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीतील अल्प उपस्थिती पाहता ते पालकमंत्र्यांकडे जातही नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.