Rahul Narwekar, Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : नियम व कायदे धाब्यावर बसवायचे ठरवलेलं दिसतंय..! भास्कर जाधव यांचा विधानसभा अध्यक्षांवर आरोप...

case of MLA disqualification : घटनात्मक पदांची गलिमा ही संपलेली आहे. हे पद आता शोभेचे पद राहिले की काय ? असा सवाल केला उपस्थित.

सरकारनामा ब्यरो

Bhaskar Jadhav : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आज आमदार अपात्र प्रकरणी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांच्या झालेल्या भेटीवरून आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टीकेचं लक्ष केलं आहे.

देशाची लोकशाही, संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखायचा असेल तर आम्ही अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अपात्र होतील ते शिंदे गटाचे आमदार. पण तरीदेखील सगळे नियम व कायदे धाब्यावर बसवायचे ठरवलेलं दिसतयं, असा गंभीर आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, आमदार अपात्र प्रकरणी आज निर्णय होणार असतानाही काल - परवा विधानसभेचे अध्यक्ष अशा पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतात. याचे दोन अर्थ निघू शकतात. एक तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना कल्पना दिलेली असावी. मला तुम्हाला अपात्र केल्याशिवाय पर्याय नाही, हे सांगण्याकरता ते कदाचित गेलेले असावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण ते कशाकरताही गेले असले तरीसुद्धा आजपर्यंत आपण दिवंगत दत्ताजी नलावडे हे विधानसभा अध्यक्ष असल्यापासून ते वरच्या सभागृहाचे जयंतराव टिळक सभापती यांच्यापर्यंत आपण अनेकांना पाहिलं पण ते पदावर असताना कधीही कुठल्याही मुख्यमंत्र्याना भेटायला गेले, असं कधीही ऐकिवात नाही. आपण कधीही पाहिले देखील नाही.

अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात. खरंतर मुख्यमंत्री अध्यक्षांना भेटायला जातात. पण इथे अध्यक्ष स्वतः भेटायला मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत. वरुन मी का गेलो याचे समर्थन करतात. याचाच अर्थ या घटनात्मक पदांची गलिमा ही संपलेली आहे. हे पद आता शोभेचं पद राहिले की काय असा संशय येत असल्याची टीका आमदार जाधव यांनी केली आहे.

आज अपात्र होणाऱ्या आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. नियम, कायदा, घटना आणि पक्षांतर्गत बंदी यानुसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला तर एकनाथ शिंदेही शंभर टक्के अपात्र होतील. हे आमदार अपात्र होणं हे केवळ शिवसेनेवर परिणाम करणार नाही तर या संदर्भात काही चुकीचा निर्णय झाल्यास देशातील लोकशाहीवर व पक्षांतर्गत बंदी कायद्यावर परिणाम करणारा हा निर्णय असेल.

शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे आमदार होतील असा दावा केला जातोय. यावर बोलताना आमदार जाधव म्हणाले की, शिंदे गट कोणता दावा करत आहे याला कोणताही कायदेशीर आधार नाही. मूळात पक्ष म्हणून भरत गोगावले हे नियमबाह्य आहेत, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे असे ते म्हणाले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT