Shivsena MLA Disqualification Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं, निकाल त्यांच्या बाजूने का लागणार?

Eknatha Shinde : आमच्याकडे 67 टक्के बहुमत आहे. लोकसभेत 75 टक्के बहुमत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवेसना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीसाठी अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. मात्र, या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक दिसून आले. आमचा पक्ष अधिकृत शिवसेना आहे. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बाजूने निकाल कोणत्या गोष्टींवर लागू शकतो, यावर मत व्यक्त केलं आहे.

अध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर आपल्यासमोर भाष्य करेन, असे सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, विधानसभेत आमच्याकडे 67 टक्के बहुमत आहे. लोकसभेत 75 टक्के बहुमत आहे. त्यामुळे अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आहे. आमच्याकडे 164 लोकांचं बहुमत आहे. मुख्यमंत्री म्हणून 164 जणांचा मला पाठिंबा आहे. मेरिटवर अध्यक्षमहोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
MLA Disqualification Case : घाबरण्याची गरजच काय?; निकालापूर्वीच शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा

अधिकृत पक्षाबाबत, चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालायने आमच्या बाजूने निकाल दिला. पक्ष आम्ही आहोत. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे अध्यक्षांनी मेरिटवर निकाल दिला पाहिजे. निवडणूक आयोगानेदेखील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार अस्तित्वात नव्हते, असे म्हणत निकाल दिला होता. आमचं सरकार हे बहुमताचं सरकार आहे, हे सर्वोच्च न्यायालयानेदेखील मान्य केलं, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...ती बैठक अधिकारी उपस्थित

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यावरून ठाकरे गटाकडून त्यांना टार्गेट करण्यात येत आहे. या भेटीवर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, ही भेट रात्रीची झाली नाही. दिवसाढवळ्या भेट झाली. या भेटीवेळी अधिकारीदेखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. बहुमत आमच्याकडे असल्याने आमचाच पक्ष अधिकृत आहे. मॅचफिक्सिंग झाली असती तर रात्री गाठीभेठी झाल्या असत्या.

R...

Eknath Shinde
CM Hemant Soren : हेमंत सोरेन मोदी सरकारला नडले; सर्व विभागांना दिला महत्त्वाचा आदेश...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com