Shivsena, BJP Sarkarnama
कोकण

Shivsena vs BJP : कोकणात भाजपला राजकीय धक्का, उदय सामंतांची मोठी खेळी; ठाकरेंच्या सेनेविरोधात उतरवले स्वीय सहाय्यकाला

Shivsena UBT setback in rural election : रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे.

Aslam Shanedivan

  1. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.

  2. भाजपला जिल्हा परिषदेत एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे.

  3. नेताजी पाटील यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक उदय सामंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

Ratnagiri News : रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. खालगाव, कोतवडे, वाटत, हातखंबा गटामध्ये तिरंगी लढत होणार असून उर्वरित सात गटांमध्ये थेट लढती आहेत. कुवारबाव गणात चौरंगी, पावस, खेडशी या दोन गणांमध्ये तिरंगी लढत होत असून उर्वरित १७ गणांमध्ये थेट लढती आहेत.

हातखंबा गटामध्ये परशुराम कदम हे अपक्ष लढत आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने गोळप गटामध्ये अपक्ष लढत असल्याने या दोन गटात कांटे की टक्कर होणार आहे. परंतु भाजपला या तालुक्यात एकही जिल्हा परिषदेची जागा न मिळाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला कितपत यश येईल यावर राजकीय गणिते अवलंबून आहेत. दुफळीमुळे उबाठा शिवसेनेतील मरगळ आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे मतदारसंघावर असलेल्या वर्चस्वामुळे शिवसेनेचे पारडे जड आहे.

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व अबाधित राहिले होते. मात्र गेल्या तीन वर्षांपूर्वी शिवसेना फुटली आणि दोन भाग झाले. त्याचा मोठा राजकीय परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. जिल्ह्यात घट्ट रोवलेली शिवसेनेची पाळेमुळे सैल झाली.

शिवसेनेचे बहुमतांशी शिलेदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेना रत्नागिरी तालुक्यात एकाकी पडली. उबाठामध्ये प्रचंड मरगळ आहे. आता तालुक्यातील सर्वांत मोठा पक्ष हा शिंदे शिवसेना आहे. भाजपला देखील त्या मान्याने तालुक्यात विस्तार करता आला नाही. तालुक्यातील या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवसेनेचे वर्चस्व स्पष्ट दिसते.

इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे आणि अंतर्गत राजकीय चढाओढीमध्ये हातखंबा गटातून शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. परशुराम कदम यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित असताना अंतर्गत राजकारणाचा ते बळी ठरले आहेत. त्यांना डावलून पक्षाने सुयोग कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे हातखंबा गटामध्ये तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेचे सुयोग कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सावंत आणि अपक्ष परशुराम कदम यांच्यात लढत होणार आहे. इथे उबाठाचा कदम यांना पडद्यामागून पाठिंबा असणार असल्याचे बोलले जात आहे.

गोळप गटामध्येही अशीच लढत होणार आहे. उबाठा शिवसेनेचे कट्टर समर्थक उदय बने यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी न दिल्याने ते पक्षातून बाहेर पडले. त्यांनी गोळप गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेथे शिवसेनेचे उमेदवर नंदकुमार मुरकर विरुद्ध अपक्ष उदय बने अशी लढत होणार आहे. ती बने आणि उदय सामंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. अन्य गटांमध्ये विरोधकांकडून तुल्यबळ उमेदवार नसल्याने तिथे आठ गटांमध्ये शिवसेनेचे पारडे जड आहे.

तालुक्यातील २० गणांपैकी दोन गण भाजपला सोडले आहेत. यामध्ये वाटद आणि हरचिरी गणाचा समावेश आहे. भाजपचे काम चांगले असल्याने तेथे भाजपाचे पारडे जड आहे. उर्वरित १८ गणांवर शिवसेना लढणार आहे. गोळप गणामध्ये मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे अविनाश गुरव हे रिंगणात आहेत.

खेडशी गणामध्ये शिवसेनेचे वैभव पाटील, मनसेचे विशाल चव्हाण आणि उबाठाचे ज्ञानेश वाडकर अशी तिरंगी लढत होणार आहे. कुवारबाव गणात ठाकरे सेनेचे उमेश राऊत, शिंदे सेनेचे गजानन धनावडे, काँग्रेसचे परशुराम खेत्री आणि राष्ट्रवादीचे नारायण खोराटे, अशी चौरंगी लढत होणार आहे. पावस गणामध्ये ठाकरे सेनेचे सुभाष पावसकर, शिवसेनेचे नामदेव कोकरे तर अपक्ष सचिन गिजबिले अशी तिरंगी लढत आहे.

गटनिहाय होणाऱ्या लढती :

पावस गट - अॅड. महेंद्र मांडवकर (शिवसेना), रविकिरण तोडणक (ठाकरेसेना)

खालगाव- महेश उर्फ बाबू म्हाप (शिवसेना), विनोद शितप (ठाकरेसेना), वैभव प्रज्ञा प्रभाकर यादव (वंचित बहुजन आघाडी)

कोतवडे - राजेश साळवी (शिवसेना), उत्तम मोरे (ठाकरेसेना), लक्ष्मीकांत मयेकर (कॉंग्रेस), नितिश गैभार (मनसे)

हातखंबा - सुयोग कांबळे (शिवसेना), मुकुंद सुजाता सावंत (वंचित बहुजन आघाडी), परशुराम कदम (अपक्ष),

वाटद - उषा सावंत (शिवसेना), संज्योत चव्हाण (ठाकरेसेना), राखी पालशेतकर

(अपक्ष)

नाचणे- प्रकाश रसाळ (शिवसेना), शशिकांत बारगोडे (ठाकरेसेना)

कर्ला- महेंद्र झापडेकर (शिवसेना), विलास भातडे (ठाकरेसेना), अमर कीर (अपक्ष)

खेडशी - हर्षदा गावडे (शिवसेना), स्मिताली नार्वेकर (ठाकरेसेना)

झाडगाव- श्रद्धा मोरे (शिवसेना), आस्था धांगडे (उबाठा)

गोळप- नंदकुमार मुरकर (शिवसेना), उदय बने (अपक्ष), विनोद शिंदे (अपक्ष)

पंचायत समितीचे गणनिहाय उमेदवार :

वाटद : संजना माने (भाजप), प्रणाली मालप (ठाकरेसेना).

कळझोंडी : अभय खेडेकर (शिंदेसेना), दिशा हळदणकर (ठाकरेसेना)

खालगांव : स्वाती गावडे (ठाकरेसेना), नेहा गावणकर (शिंदेसेना)

करबुडे : सुरेश कारकर (ठाकरेसेना), प्रवीण मेस्त्री (पांचाळ) (शिंदेसेना)

नेवरे : पूर्वा दुर्गवळी (शिंदेसेना), दिव्या आग्रे (ठाकरेसेना)

कोतवडे : स्वप्नील मयेकर (शिंदेसेना), हरिश्चंद्र धावडे (ठाकरेसेना)

साखरतर : परेश सावंत (शिंदेसेना), आदेश भाटकर (ठाकरेसेना)

झाडगाव म्यु.बाहेर : सुगरा काझी (ठाकरेसेना), साक्षी कुमठेकर (शिंदेसेना)

खेडशी : वैभव पाटील (शिंदेसेना), विशाल चव्हाण (मनसे), ज्ञानेश वाडकर

(ठाकरेसेना)

केळये : सुमेश आंबेकर (शिंदेसेना), गौरव नाखरेकर (ठाकरेसेना)

हातखंबा : विद्या बोंबले (शिंदेसेना), श्रुती जौंजाळ (ठाकरेसेना)

नाणीज: डॉ. पद्मजा कांबळे (ठाकरेसेना) (बिनविरोध)

कुवारबाव : उमेश राऊत (ठाकरेसेना), गजानन धनावडे (शिंदेसेना), परशुराम खेत्री (काँग्रेस), नारायण खोराटे (राष्ट्रवादी काँग्रेस) नाचणे : विजय ढेपसे (ठाकरेसेना), सचिन सुपल सुपल (शिंदेसेना)

कर्ला : नसिमा डोंगरकर (राष्ट्रवादी शरद पवार), कांचन नागवेकर (शिंदेसेना)

हरचिरी : दत्तात्रय गांगण (ठाकरेसेना), संयोग उर्फ दादा दळी (भाजपा)

भाट्ये : अर्चना साळवी (शिंदेसेना), किरण नाईक (ठाकरेसेना)

गोळप : अविनाश गुरव (ठाकरेसेना), नेताजी पाटील (शिंदेसेना)

पावस : सुभाष पावसकर (ठाकरेसेना), नामदेव कोकरे (शिंदेसेना), सचिन गिजबिले

(अपक्ष)

गावखडी : कृपा पाटील (ठाकरेसेना), स्वाती शिंदे (शिंदेसेना).

FAQs :

Q1. रत्नागिरी तालुक्यात निवडणूक का महत्त्वाची ठरत आहे?
👉 शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षामुळे ही निवडणूक महत्त्वाची ठरत आहे.

Q2. उदय सामंत यांची भूमिका काय आहे?
👉 पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रभावामुळे शिवसेनेचे पारडे जड मानले जात आहे.

Q3. नेताजी पाटील कोण आहेत?
👉 नेताजी पाटील हे उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक असून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Q4. भाजपची स्थिती काय आहे?
👉 भाजपला तालुक्यात जिल्हा परिषदेत एकही जागा न मिळाल्याने नाराजी आहे.

Q5. उबाठा शिवसेनेवर निवडणुकीचा काय परिणाम होईल?
👉 पक्षातील दुफळीमुळे उबाठा शिवसेनेची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT