Shivsena VS BJP : शिवसेना जिल्हाप्रमुखाचे भाजप आमदाराला ओपन चॅलेंज; ‘सगळ्या तालमी आमच्यासाठी खमक्या; आता तू फक्त तुझी काळजी कर...’

Amol Shinde Challenge to Devendra Kothe : सोलापूर महापालिका निवडणुकीत महायुती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले असून शिवसेनेचे अमोल शिंदे यांनी आमदार देवेंद्र कोठेंना थेट आव्हान दिले आहे.
Amol Shinde-Devendra Kothe
Amol Shinde-Devendra KotheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 January : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुती तुटली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असून त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे ठाकले आहेत. निवडणुकीला अवघे चार दिवस राहिलेले असतानाच महायुतीमधील भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध तुफान रंगले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांना उघड चॅलेंज दिले आहे. यापुढच्या काळात तुझी आणि माझी गाठ शहर मध्य मतदारसंघात १०० टक्के आहे. आता तु फक्त तुझी काळजी कर, असे आव्हान जिल्हाप्रमुख शिंदे यांनी आमदार कोठेंना दिले आहे.

अमोल शिंदे (Amol Shinde) म्हणाले, सोलापूरकरांनी यापूर्वी काँग्रेसची आणि गेली नऊ वर्षे भारतीय जनता पक्षाची सत्ता पाहिलेली आहे. पण, सोलापूरकरांना दररोज पाणी मिळू शकलेले नाही. लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, पण नळाला पाणी नाही, ही सोलापूरकरांची व्यथा आहे. त्यामुळेच आमच्या शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

महापालिकेच्या लढाईत भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता कुठंही दिसत नाही. कारण, त्यांच्या उमेदवाऱ्या तेव्हाच कापल्या आहेत. निष्ठावंतांना सोडून उपऱ्यांना पक्षात आणून आमच्यासमोर उभं करण्याचं काम सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील एक वर्षाचा आमदार मागील महापालिका निवडणुकीत आमच्याच जीवावर या प्रभागातून निवडून आला होता, असा दावाही अमोल शिंदे यांनी केला.

ते म्हणाले, आमदार देवेंद्र कोठे यांच्या नावाची अकरा मतं या प्रभागात आहेत. या प्रभागातील सर्वधर्मीय लोकांनी मागील निवडणुकीत त्याला डोक्यावर घेतलं आणि निवडून आणलं. म्हणून ते आज आमदार होऊ शकले आहेत. आता ते सांगतात की, प्रभाग क्रमांक सातमध्ये मीच उमेदवार आहे. मला माहिती आहे की, तुमच्या उमेदवाराने मागंच मैदान सोडलं आहे.

आता प्रभाग सातमधील लढाई ही आमदार देवेंद्र कोठे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे अशीच असणार आहे. माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, तुम्ही तुमची जेवढी ताकद आहे, तेवढी लावा. मी माझ्यासोबत असणाऱ्या मायमावल्या आणि कार्यकर्त्यांची ताकद लावतो, असे आव्हानही शिंदे यांनी कोठे यांना दिले आहे.

Amol Shinde-Devendra Kothe
Gopichand Padalkar : पडळकरांनी पवारांना पुन्हा डिवचले; मी 10 वर्षे तुमच्या नादाला लागलोय, तुम्ही माझं काय केलंय; ते लांडगेंचं करणार आहात?

ते म्हणाले, गेल्या चार दिवसांपासून आमच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्रास दिला जात आहे. विविध यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या आमच्या लोकांना बोलावलं जातं. तुझ्या भावाची बदली करून टाकेन, तुझ्या माणसाला इथून सस्पेंड करून टाकेन. अशा पद्धतीने आम्ही अन्याय सहन करतो.

सोलापूर शहर मध्यच्या आमदाराने हस्तक्षेप करून भाजपचं वाटोळं करून टाकलं आहे. लोकशाही पद्धतीने चालेल्या निवडणुका वेठीस धरण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. प्रभाग सातमधील जनता प्रचंड हुशार असून जनतेसाठी कोण रस्त्यावर उतरतंय आणि भांडण लावून कोणी राजकारण केलंय. तुम्ही लोकांची पिळवणूक केली, हे सर्वांना माहिती आहे, असेही शिंदेंनी सुनावले.

Amol Shinde-Devendra Kothe
Ajitdada Vs Mahesh Landge : अजितदादासुद्धा चुकलेत, त्यांनी नको त्यांना मोठं केलं : लांडगेंच्या एकेरी उल्लेखानंतर कट्टर समर्थकाने व्यक्त केली परखड भावना

आता गाठ शहर मध्य मतदारसंघात : शिंदे

प्रभाग सातमधून आम्ही निवडून येऊच; पण यापुढच्या काळात तुमची आणि माझी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात गाठ आहे, एवढंच सांगतो. मी काय करायचं हे लोक ठरवतील. पण, माझी आणि त्यांची गाठ सोलापूर शहर मध्य मतदारसंघात असणार हे १०० टक्के निश्चित आहे. आमच्या सर्व तालमी आमच्यासाठी खमक्या आहेत, आता फक्त तुझी काळजी कर, असे चॅलेंज अमोल शिंदे यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com