Ramdas Kadam sarkarnama
कोकण

Ramdas Kadam News : "वडिलांच्या विचारांशी बेइमानी, गद्दारी करणारी औXXX उद्धव ठाकरेंची", कदमांची टीका

सरकारनामा ब्युरो

प्रसाद रानडे -

शिवसेना नेते, माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांनी रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधील लोटे येथे शिवसेना-राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचा समाचार घेतला आहे. "काँग्रेसबरोबर जाऊन आपल्या वडिलांच्या विचारांशी बेइमानी, गद्दारी करणारी औXXX ही उद्धव ठाकरेंची आहे," अशी जहरी टीका रामदास कदमांनी केली आहे.

या सभेला खासदार सुनील तटकरे( Sunil Tatkare ), शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रामदास कदम म्हणाले, "काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ आली, तर शिवसेना नावाचे दुकान बंद करून टाकीनं, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. पण, आपल्या वडिलांच्या विचारांशी बेइमानी आणि गद्दारी करणारी औXXX उद्धव ठाकरेंची आहे. 40 पैकी एका जरी आमदारानं 50 खोके घेतल्याचं सिद्ध करून दाखवलं, तर मी ठाकरेंच्या घरी भांडी घासेन, असं आव्हान उद्धव ठाकरेंना मी दिलं होतं."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचा अपमान करून उद्धव ठाकरेंनी स्टेजच्या खाली उतरवलं होतं. बाळासाहेबांबरोबर जे नेते होते, त्या सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी मुलासाठी केला. 2009 मध्ये उद्धव ठाकरेंनी मला पाडलं. कारण, विरोधी पक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो. पण, ते होऊ नये म्हणून मला उद्धव ठाकरेंनी पाडलं," असा आरोप रामदास कदमांनी केला.

"माझा पराभव झाल्यानं खेड भागाचं मोठं नुकसान झालं. मला बाळासाहेबांनी लगेच विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलं. मात्र, हे शल्य आजही माझ्या मनात आहे. दापोली मतदारसंघात माझा मुलगा आमदार असताना मी तिकडं निधी न देता, जिल्हा परिषद गटात 50 कोटी रुपयांचा विकासासाठी निधी मिळवून दिला," असं रामदास कदमांनी सांगितलं,

"वाशिष्ठी नदीचं समुद्राला जाणारे 67 टीएमसी पाणी हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगडसाठी उपयोगात आणायचा आहे. प्रत्येक गावागावांत पाणी गेलं पाहिजे. रोजगार निर्माण झाला पाहिजे या प्रस्तावाला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे," असं रामदास कदम म्हणाले.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT