uddhav thackeray, Suryakant Dalvi  sarkarnama
कोकण

Suryakant Dalvi News : कोकणात उद्धव ठाकरे गटाला धक्का; माजी आमदाराचा मोठा निर्णय

Shivsena : रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपला आपले संघटन मजबूत करायचे आहे. त्यासाठी सूर्यकांत दळवी यांचा मोठा उपयोग होऊ शकतो.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri : कोकणामधून ठाकरे परिवाराला नेहमीच साथ मिळाली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर कोकणातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत कायम होते. मात्र, अनेक नेते शिंदे गटात गेले. त्यामुळे आता कोकणावर उद्धव ठाकरेंनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी ठाकरे कोकणचा दौरादेखील करणार आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाली माजी आमदार सूर्यकांत दळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांचा आता भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. गुरुवारी (ता. 1 फेब्रुवारी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत दळवी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटात नाराज असल्याने हा निर्णय ते घेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्यासोबतच अजून कोणकोणते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार, याची उत्सुकता असणार आहे. सूर्यकांत दळवी यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दुजोरा दिला आहे. (Suryakant Dalvi News)

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम यांच्याविरोधातील आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले होते. दीड वर्षापूर्वी झालेल्या दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांना आमदार योगेश कदम यांना शह देण्याच्या राजकारणात साथ देत महत्त्वाची भूमिका बजावली होती. इतकेच नाही, तर 25 वर्षे आमदार राहिल्यानंतर ज्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, त्या माजी आमदार संजय कदम यांच्यासोबतही जुळवून घेत रामदास कदम, योगेश कदम यांना विरोध केला. पण अलीकडे आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौर्‍यात ज्येष्ठ असलेल्या सूर्यकांत दळवी यांना बाजूला करीत आदित्य ठाकरे यांच्याकडून संजय कदम यांचा भावी आमदार असा उल्लेख केला गेला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतील संजय कदम यांची उमेदवारीदेखील आदित्य ठाकरे यांनी जाहीर केली.

भाजपला फायदा?

दळवी हे गेले काही महिने सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर कितपत फायदा होईल, हे लगेच सांगता येणार नाही. मात्र, रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपला आपले संघटन मजबूत करायचे आहे. त्यासाठी दळवी यांचा मोठा उपयोग होऊ शकतो. तसेच सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम यांचे विळ्या-भोपळ्याचे असलेले सख्य पाहता दळवींचा भाजप पक्षप्रवेश हा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील कदम यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT