Uday Samant Sarkarnama
कोकण

Uday Samant : काँग्रेसचा घेतला समाचार, तर ठाकरेंना खुलं आव्हान; उदय सामंत नेमकं काय म्हणाले...

Mahayuti Politics : रत्नागिरीत १४ जानेवारीला महायुतीचा मेळावा

Sunil Balasaheb Dhumal

Konkan Political News : लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून 14 जानेवारीला शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. त्याची तयारीची बैठक गुरुवारी रत्नागिरी येथे झाली.

यावेळी मंत्री उदय सामंतांनी राम मंदिराचे आमंत्रण नाकारल्याबाबत काँग्रेसला टीकेचे लक्ष केले. आम्हाला 'सो कॉल्ड' गद्दार म्हणणाऱ्या नेत्यांनी आता हिंदुत्वाच्या विचारांशी कोणी गद्दारी केली, हे ठरवावे असा टोला सामंतांनी लगावला. आता या सगळ्याचे उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्यांनी द्यावे, असंही थेट आव्हान सामंतांनी दिले.

'राम मंदिर होऊ नये हाच काँग्रेसचा अजेंडा होता. आज राम मंदिर झाल्यानंतर त्या मंदिराच्या उद्घाटनाच आमंत्रण नाकारणे हा अवघ्या देशवासीयांचा अपमान आहे. म्हणून आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या सो कॉल्ड नेत्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे,' असे म्हणत सामंतांनी काँग्रेस नेत्यांना खिंडीत पकडले.

'राम मंदिराच निमंत्रण नाकारतो, राम मंदिरावर टीका करतो, राम मंदिर बनवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतो, अशा काँग्रेस पक्षाबरोबर तुम्ही भविष्यात राहणार आहात का, हे त्यांनी जाहीर करावे, असे खुले आव्हान सामंतांनी ठाकरेंना दिले.' 'अयोध्येत श्री प्रभुरामाचे मंदिर उभे राहिला पाहिजे, 370 कलम हटवले गेले पाहिजे, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ही दोन्ही काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहेत,' याचीही सामंतांनी आठवण करून दिली.

सत्तासंघर्षांवरील विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावरून आम्ही समाधानी आहोत. आता घटनाबाह्य कोण आहे, ते सिद्ध झाले. मात्र एका निकालावरून आम्ही नक्की नाराज आहोत, की एवढे सगळे होऊनही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 13 आमदार अपात्र का नाही झाले नाहीत याची शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, अशीही जाहीर नाराजी उदय सामंत (Uday Samant) यांनी यावेळी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राज्य स्तरावरून तीनही पक्षाचे समन्वयक नियुक्ती झाली आहे. यात अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम, शिवसेने माजी आमदार सदानंद चव्हाण व भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याची माहिती सामंतांनी दिली. आता लवकरच तालुका स्तरावरही समन्वयकांची नावे जाहीर होतील. विधानसभा मतदारसंघ व जिल्हा परिषद गटनिहाय सुद्धा महायुतीचे मेळावे होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT