Mumbai News : महायुतीमधील जागावाटप जवळपास फायनल झाल्याने शिंदे शिवसेनेच्या उमेदवार यादीला आज गुरुवारी अखेर मुहूर्त लागला आहे. शिंदे गटाच्या आठ जणांची नावे जाहीर करण्यात आली. महायुतीमधील भाजपने महाराष्ट्रातील 24 लोकसभा मतदारसंघांत उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता शिवसेनेही 8 जागावंर उमेदवारी जाहीर केली आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, खासदार सुनील तटकरे यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बुधवारी रात्री राज्यस्तरीय जागावाटपासंदर्भात चर्चा केली. या वेळी भाजपने जाहीर केलेल्या 24 जागांच्या व्यतिरिक्त उर्वरित 24 जागांवर चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुरुवारी शिवसेना (Shivsena) पक्षाकडून 8 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले. रायगड, नाशिक, यवतमाळ वाशीम, ठाणे, बारामती या जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रामटेक - राजू पारवे
बुलडाणा - प्रतापराव जाधव
मावळ - श्रीरंग बारणे
शिर्डी - सदाशिव लोखंडे
हिंगोली - हेमंत पाटील
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
कोल्हापूर - संजय मंडलिक
हातकणंगले - धैर्यशील माने
शिंदे शिवसेना गटाच्या आठ जणांच्या यादीत विद्यमान सात खासदारांना उमेदवारी दिली आहे. केवळ रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यासोबतच कल्याण डोंबवली मतदारसंघातून श्रीकांत शिंदे (Shrikanat Shinde), यवतमाळ वाशिम - भावना गवळी (Bhavna Gawali), पालघर - राजेंद्र गावित, नाशिकमधून हेमंत गोडसे, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांच्या उमेदवारींची घोषणा करण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.