Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar News : महाविकास आघाडीबाबत आंबेडकरांनी व्यक्त केली 'ही' शंका; राऊतांवरही केला आरोप

Prakash Ambedkar On Congress : "चेन्नीथलांशी तडजोडीबाबत चर्चा झाली, पण कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत," असंसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. पण, अद्यापही महाविकास आघाडीचं जागावाटप झालं नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे जागावाटप रखडल्याचं बोललं जात आहे. पण, "जागावाटप न होण्याचं कारण वंचित बहुजन आघाडी नाही. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत 15 जागांवरून मतभेद आहेत. महाविकास आघाडीचं भांडण संपल्यावर आम्ही जागांची मागणी करू. ते एकत्र लढणार का? हे अद्याप स्पष्ट झालं नाही," अशी शंका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"'वंचितनं महाविकास आघाडीकडं जागांची मागणी केली नाही,' अशी खोटी माहिती संजय राऊत माध्यमांना देतात. पण, महाविकास आघाडीची भांडण संपल्यावर आम्ही जागांची मागणी करू. ते एकत्र लढणार का? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. हे घोंगडं भिजत असल्यानं मी काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांच्याशी संवाद साधला. तसेच, काँग्रेस आणि वंचितमध्ये तडजोड करू, असं चेन्नीथलांना सांगितलं. पण, चेन्नीथलांकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत," असं प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"...अन् मग महाविकास आघाडीशी चर्चा करू"

"काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना माझ्या सहीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. मात्र, अद्यापही काँग्रेसकडून याला उत्तर आलं नाही. महाविकास आघाडीची जागावाटपाबद्दल चर्चा लवकरात लवकर संपेल, अशी अपेक्षा आहे. मग, आम्ही महाविकास आघाडीशी चर्चा करू," असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

"काँग्रेसला प्राथमिकता ठरवावी लागेल"

"ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी चर्चा न करतात 42 जागांची घोषणा केली. गुजरात आणि कर्नाटकात काँग्रेसनं आपबरोबरोबर युती केली. पण, ती युती टिकणार का? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपचं सरकार केंद्रातून घालवणं की आपला पक्ष वाढवणं, ही प्राथमिकता काँग्रेसला ठरवावी लागेल," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

"...तर वंचित धोरणात्मक निर्णय घेणार"

"महाविकास आघाडीशी युती झाली नाही, तर वंचित आघाडी धोरणात्मक निर्णय घेईल," असंही आंबेडकरांनी सांगितलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT