Eknath Shinde appoints woman leader to key post Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेनेत घमासान! कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब?

Political News : रिक्त असलेल्या या उपसभापतिपदाची निवडणूक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. हे पद महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : विधान परिषदेच्या रिक्त 17 जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. गेल्या काही दिवसापासून विधानपरिषदेच्या उपसभापतिपद रिक्त आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या या उपसभापतिपदाची निवडणूक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. हे पद महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चुरस दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात उपसभापती पदी पुन्हा एकदा निलम गोऱ्हे यांची वर्णी लागणार की ऐनवेळी नवे नाव पुढे येणार याची उत्सुकता लागली आहे.

महायुतीमध्ये विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे (BJP) तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर विधानपरिषदेचे सभापती पद भाजपकडे आहे. त्यामुळे उपसभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

विधानपरिषदेचे उपसभापतिपद हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे शिवसेनेत (Shivsena) या पदासाठी रस्सीखेच होणार असल्याचे दिसत आहे. या पदासाठी ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे इच्छुक असल्यातरी ऐनवेळी शिवसेनेतून दुसरे नाव येणार का ? याबाबत उत्सुकता लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नीलम गोऱ्हे या पदावर आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेकडून कोणाला संधी दिली जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने आवाज उठवला आहे.

शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत तीनदा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचेच नाव विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT