Parbhani Lok Sabha : परभणीकरांनी शिवसेनेसोबत बंड करणाऱ्या किती खासदारांना घरी बसवले; पाहा 38 वर्षांचा रंजक इतिहास!

Parbhani politics News : परभणी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन गद्दारी करणाऱ्या खासदारांची संख्या काही कमी नाही.
Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray, uddhav thackreaySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : जगात जर्मनी व देशात परभणी अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या परभणीचा राजकीय पॅटर्नही काहीसा वेगळाच आहे. 1989 पासून परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहिला तर या ठिकाणी एक वेळेसचा अपवाद वगळता सलग सात वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आलाय. त्याशिवाय परभणी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन गद्दारी करणाऱ्या खासदारांची संख्या काही कमी नाही. पण परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या 38 वर्षांत पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवलाय, की पक्ष सोडताना प्रत्येक जण दहा वेळा विचार करतो.....की पक्ष सोडायचा की नाही.

नव्वदच्या दशकानंतर मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेनेचे (Shivsena) प्रभुत्व होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जाहीर सभांमधून नेहमी गद्दारांना लाथाबुक्क्यांनी तुडवा, असा आदेश आपल्या शिवसैनिकांना द्यायचे. त्याचमुळे परभणीत प्रत्येकवेळी पक्षाशी गद्दारी झाली, लोकांनी त्यांना घरी बसवले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात मुळच्या शिवसेनेच्या आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्यांनी उमेदवाऱ्या मिळवल्या, जिंकले पाच-दहा वर्षे खासदारकी भोगली आणि एवढे होऊन पुन्हा पक्षावर नाराजी व्यक्त करत निघूनही गेले. अशोक देशमुख या जिल्ह्यातील पहिल्या खासदारापासून ते आतापर्यंतच्या ॲड. गणेश दुधगावकर यांच्यापर्यंत सर्वांच्याच बाबतीत हा अनुभव आला आहे.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Maharashtra News Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

अशोक देशमुख, ॲड. सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील, गणेश दुधगांवकर या पैकी अनेकांनी तर दहा वर्ष खासदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलं...... पण कालांतरानं पक्षश्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत कुणी कॉंग्रेस,तर कुणी राष्ट्रवादीची वाट धरली. वीस-बावीस वर्ष उलटली तरी शिवसेनेच्या या राजकीय परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही.

1990 च्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेझ होती. परभणी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा 1989-90 साली शिवसेनेचे अशोक देशमुख, 1991-96 मध्ये शिवसेनेचे अशोक देशमुख यांना पुन्हा निवडून दिले. मात्र त्यांनी या निवडणुकीनंतर पक्ष सोडला. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने अशोक देशमुख यांना खासदार केले. पुढे केंद्रातील नरसिंह राव सरकार वाचवण्यासाठी त्यांनी पक्षासोबत बंड केले. यामुळे देशमुखांना 1996 च्या निवडणुकीत काँग्रेसची (Congress) उमेदवारीही मिळाली. पण परभणीतले हे बंड बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगलंच जिव्हारी लागले..... त्यांनी फारशी राजकीय ओळख नसणाऱ्या सुरेश जाधव यांना निवडणुकीत देशमुखांविरुद्ध मैदानात उतरवले..... नवख्या असलेल्या सुरेश जाधवांनी यांनी अशोक देशमुख यांना अस्मान दाखवले होते.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

त्यानंतर 1998 च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा पराभव केला. हा एकमेव अपवाद असा वगळता या मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला पराभव आला नाही. 1999 मध्ये शिवसेनेने मतदारसंघ पुन्हा जिंकला आणि सुरेश जाधव खासदार झाले. पण सुरेश जाधवांनीही 2004 च्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. मग शिवसैनिकांनीही त्यांना घरी बसवले होते.

2004 मध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे-पाटील हे शिवसेनेचे परभणीचे खासदार झाले. पण अणू करारावरून झालेल्या मतदानाच्या वेळी पक्षादेश झुगारून केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाला अनुपस्थित राहून रेंगे यांनी शिवसेनेसॊबत गद्दारी केली. त्यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली. 2009 मध्ये त्यांनी शिवसेनेविरोधातच परभणी विधानसभा लढवली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांनी तुकाराम रेंगे-पाटलांना चारी मुंड्या चित केले होते. या माध्यमातून पक्ष सोडणाऱ्या मंडळींना शिवसैनिक धडा शिकवतात हे दाखऊन दिले.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
shivsena UBT : ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराचा सुपुत्र विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार : काँग्रेस उमेदवाराला घ्यायला लावली होती माघार; आता काय होणार?

शिवसेनेने 2009 मध्ये मात्र नवा प्रयोग केला. निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेनं पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले. दुधगावकरांना मात्र शिवसेना मानवली नाही. खासदारकीचा कालावधी संपत असतानाच दुधगावकर यांनी शिवसेनेशी अंतर ठेवत सक्रिय राजकारणातून बाहेर जाणं पसंद केलं...

परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहीला तर अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगांवकर अशी शिवसेनेसोबतच बंड करणाऱ्या खासदारांची मोठी परंपरा आहे. त्याच मुळे येत्या काळात शिवसेनेसोबत बंडखोरी करण्याचं धाडस कोणी करू शकेल असे वाटत नाही. परभणीत जर शिवसेनेसोबत कोणी बंडखोरी केली तर त्याला शिवसैनिक कायमचे घरी बसविण्यासाठी सज्ज असतात असा हा गेल्या 38 वर्षातला इतिहास सांगतो. त्यानंतरच्या काळात याठिकाणी 2014 पासून संजय जाधव सलग तीन वेळा खासदार राहिले आहेत. मोदी लाटेत देखील त्या या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात याठिकाणी काय घडणार? याबाबतचा सस्पेन्स चांगलाच वाढला आहे.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
MLC election : ऐनवेळी उमेदवाराची माघार,125 मते फोडली! धाराशिव-बीड-लातूरमध्ये पुन्हा 'घोडेबाजार' की मोठा उलटफेर? काँग्रेसमुळे सस्पेन्स वाढला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com