Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal sarkarnama
महाराष्ट्र

BJP dominance : नगरपालिका निवडणूक भाजपच्या आमदार-खासदारांची जहागिरी : राष्ट्रवादी, शिवसेनेतही नात्यागोत्याचे वर्चस्व

Maharashtra municipal elections News : स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ओळखली जाते. मात्र, या निवडणुकीतही नेत्यांच्या वाड्यांवरूनच नगरपालिकेची सूत्रे हलल्याचे दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील चार वर्षापासून रखडलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. मात्र, दुसरीकडे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचे वर्चस्व पहावयास मिळवले. स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ओळखली जाते. मात्र, या निवडणुकीतही नेत्यांच्या वाड्यांवरूनच नगरपालिकेची सूत्रे हलल्याचे दिसत आहे. त्यामध्ये नगरपालिकेच्या आखाड्यात भाजपचे सर्वाधिक वारसदार निवडून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा उमेदवारांच्या रूपाने घराणेशाहीचे नवे रूप दिसून येत आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचे वर्चस्व दिसून येत आहे. या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोठया प्रमाणात घराणेशाही पुढे आली आहे. जवळपास 75 उमेदवार घराणेशाहीशी निगडित होते. एकूण उमेदवारांच्या जवळपास 70 टक्के उमेदवार महायुतीचे आहेत. त्यामध्ये भाजपचे (BJP) 45 टक्के उमेदवार आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीतही घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे.

एकूण घराणेशाही उमेदवार 75 होते. त्यापैकी 35 उमेदवार विजयी झाले आहेत. तर 40 उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यातील भाजपचे 32 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे- 15, तर अजित पवार यांच्या पक्षाचे- 13 उमेदवार होते. त्यामध्ये भाजपचे 18, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena)-8, तर अजित पवार यांच्या पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये एकंदरीतच भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.

घराणेशाहीमुळे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे :

अनगर - प्राजक्ता पाटील (भाजप) माजी आमदार राजन पाटील यांची सून

दुधनी - प्रथमेश म्हेत्रे (शिवसेना ) माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे

पंढरपूर - प्रणिती भालके (स्थानिक आघाडी) माजी आमदार भारत भालके यांच्या सून

अक्कलकोट - मिलन कल्याणशेट्टी (भाजप) आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे भाऊ

उमरगा : किरण गायकवाड (शिवसेना) खासदार रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव

मुरूम : बापूराव पाटील (भाजप) माजी आमदार बसवराज पाटील यांचे बंधू

परंडा : समरजीतसिंह ठाकूर (भाजप) माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर यांचे चिरंजीव

सिल्लोड : समीर सत्तार (शिवसेना ) अब्दुल सत्तार यांचा मुलगा

संगमनेर : मैथिली तांबे (आघाडी) येथे आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी

नंदुरबार : रत्ना रघुवंशी( शिवसेना) आमदार रघुवंशी यांच्या पत्नी

दोंडाईचा : नयनकुंवर रावल(भाजप) मंत्री रावल यांची आई

शिरपूर: चिंतन पटेल(भाजप) माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा

बुलढाणा : पूजा गायकवाड ( शिवसेना) आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी

खामगाव : अपर्णा फुंडकर(भाजप) मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी

यवतमाळ : प्रियदर्शिनी उईके (भाजप) मंत्री अशोक उईके यांची मुलगी

पुसद : मोहिनी नाईक (राष्ट्रवादी अजित पवार) मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी

चंद्रपूर : अरुण धोटे(काँग्रेस) माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू

धामणगाव रेल्वे : अर्चना रोठे ( भाजप) आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी

चिखलदरा : अल्हाद कलोती (भाजप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ

साकोली : देवश्री कापगते (भाजप) माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सून

जामनेर : साधना महाजन(भाजप) मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी

चाळीसगाव : प्रतिभा चव्हाण (भाजप) आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी

पाचोरा: सुनिता पाटील ( शिवसेना) आमदार किशोर पाटील यांची पत्नी

मुक्ताईनगर : संजना पाटील (शिवसेना) आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी

मुरगूड : सुहासिनी परदेशी ( शिवसेना) येथे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी

जयसिंगपूर : संजय पाटील (आघाडी) आमदार राजेंद्र पाटील यड्रवकर यांचा भाऊ

आष्टा : विशाल शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार) माजी आमदार विलासराव शिंदे यांचा मुलगा

कागल : सेहरनिदा मुश्रीफ (अजित पवार राष्ट्रवादी) मंत्री हसन मुश्रीफ यांची सून

देवळाली : सत्यजित कदम (भाजप) चंद्रशेखर कदम यांचा मुलगा

श्रीरामपूर : करन ससाणे(कॉंग्रेस) माजी आमदार ससाणे यांचा मुलगा

पाथर्डी : अभय आव्हाड (भाजप )वडील बाबूजी आव्हाड माजी आमदार

गंगाखेड : उर्मिला केंद्रे (अजित पवार राष्ट्रवादी) माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण

अंबेजोगाई : नंदकिशोर मुंदडा (आघाडी) आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे

हिंगोली : रेखा बांगर ( शिवसेना) आमदार बांगर यांची वहिनी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT