sharad pawar, ajit pawar sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar News : अजित पवार खरंच आजारी की नाराजी? शरद पवार म्हणाले...

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरुर मतदारसंघामध्ये 11 मे रोजी जाहीर सभेत दिसले होते. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी जाहीर सभा घेतली होती.

Roshan More

Maharashtra Politics : चौथ्या टप्प्यातले मतदान 13 मे रोजी पार पाडले. या मतदानाच्या टप्प्यानंतर महायुतीचे महत्त्वाचे तीन कार्यक्रम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi महायुतीसाठी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. तसेच मुंबईत रोडशो केला. मात्र, या दोन्ही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या. मात्र, ते आजारी असल्याची माहिती समोर आली. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अजित पवारांच्या आजारपणावर भाष्य केलं.

'अजित पवारांची Ajit Pawar तब्येत खरोखरच बरी नसल्याने ते नरेंद्र मोदींच्या रोड शोमध्ये अनुपस्थित होते.', असे शरद पवार म्हणाले. नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. 'माझ्या मते ते आजारी आहेत. त्यांची तब्येत खरंच ठीक नाहीये.', असे शरद पवार Sharad Pawar म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरुर मतदारसंघामध्ये 11 मे रोजी जाहीर सभेत दिसले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेनंतर 14 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर, राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल उपस्थित होते. अजित पवार नसल्याने उलटसुलट चर्चा सुरु होत्या. त्यानंतर महायुतीची नाशिकमध्ये जाहीर सभा झाली त्या सभेला देखील अजित पवार अनुपस्थित होते. पंतप्रधानांच्या मुंबईतील रोडशोला देखील ते अनुपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरं कारण आलं समोर

अजित पवार आजारी असल्याचे चर्चा होत्या. मात्र, त्यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे काही सांगण्यात येत नव्हते. मात्र, आज राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रचारापासून अजित पवार लांब असल्याचे कारण सांगितले. अजित पवारांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याने त्यांना डाॅक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे ते विश्रांती घेत असल्याचे उमेश पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT