Eknath Shinde News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी नाशिक शहरात रोड शो झाला. महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी झालेला हा रोड शो वेगळ्याच कारणाने चर्चेत आला.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठी गुरूवारी शहरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला. या रोड शो मध्ये शिवसेना शिंदे गटाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील सिटी सेंटर मॉल येथून सुरू झालेला हा रोड शो गंगापूर रोड अशोक स्तंभ रविवार कारंजा मेन रोड मार्गे विविध भागातून गेला. त्याचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वाहनांसह यामध्ये सहभाग घेतला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हा रोड शो नाशिक (Nashik) शहरातील गंगापूर रोड वरून रावसाहेब थोरात सभागृहाजवळून जात होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा सामना झाला.यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा देण्यात आल्या. हे कार्यकर्ते वारंवार घोषणा देत रोड शो मध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना हिणवत होते. ही बाब लक्षात आल्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाचे चिन्ह उंचावत धनुष्यबाण, धनुष्यबाण अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) 13 मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे. येत्या सोमवारी 20 मे रोजी हे मतदान होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या दोन दिवसात शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रचारावर विशेष लक्ष दिले आहे. विविध भागात प्रचार फेऱ्या आणि चौकसभा होत आहे. उमेदवार गोडसे यांनी शहराच्या विविध भागात जात नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन चौकसभा घेतल्या. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांच्या प्रचारात आता जोर आला आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.