Balasaheb Thorat, Uddhav Thackeray & Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rajya Sabha election: राज्यसभेसाठी ठाकरे-पवारांना चान्स की बाळासाहेब थोरातांना उमेदवारी? काँग्रेसमध्ये पुढील 24 तास वेगवान घडामोडींचे

MVA lone seat battle News : महायुतीच्या वाट्याला सहा जागा येणार आहेत. तर एकमेव जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. या एकमेव जागेवरून महाविकास आघाडीतील तीन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यसभेच्या राज्यातील सात जागेंच्या निवडणुकाची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. येत्या आकळत होत असलेल्या या सात जागेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच महायुतीच्या वाट्याला सहा जागा येणार आहेत. तर एकमेव जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. या एकमेव जागेवरून महाविकास आघाडीतील तीन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यातच आता होत असलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरु केली असून गुरुवारी दुपारी काँग्रेसच्या आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यानुसार या बैठकीनंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.

राज्यसभेच्या या एका जागेवरून गेल्या एकही दिवसापासून महाविकास आघाडीतील तीन पक्षात मोठी चुरस पाहवयास मिळत आहे. या एका जागेसाठी आघाडीतील मित्र पक्ष असेलल्या काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जागा रिक्त होणार असल्याने या जागेवर त्यांचा दावा आहे. त्यातच आता काँग्रेसदेखील या जागेसाठी प्रयत्नशील असून त्यासाठी भेटीगाठी घेतल्या जात आहेत. काँग्रेसकडून या जागेसाठी सलग 8 टर्म आमदार असलेले बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

त्यातच विचार विनिमय करण्यासाठी गुरुवारी दुपारी विधिमंडळात काँग्रेसच्या आमदारासह ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये राज्यसभेची निवडणूक लढवायची की नाही याबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय दिल्लीतील हायकमांडला कळवला जाणार आहे. त्यानुसार आता काँग्रेसचे नेते कामाला लागले आहेत. त्यानुसार आता आघडीतील नेत्यांची भेटीगाठी घेतल्या जात आहेत.

दरम्यान, राज्यसभेच्या या जागेसाठी काँग्रेसने (Congress) प्रयत्न सुरु केले आहेत. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी याबाबत उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन मंगळवारी भेट घेतली आहे. राज्यातील काँग्रेसमधील बहुतांश नेते राज्यसभेची जागा आपल्याकडे राहावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. शरद पवार यांच्या सोबतच ठाकरेसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी देखील ही जागा त्यांच्या वाट्याला यावी, यासाठी जोर लावला आहे.

काँग्रेसकडून या पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना राज्यसभेवर पाठवायच्या विचारात आहे. मुंबईत काँग्रेस नेत्याची दोन दिवसापूर्वी एक बैठक झाली. त्या बैठकीत थोरात यांच्या नावासंदर्भात चर्चा झाली. थोरात नुकतेच दिल्लीला जाऊन आले आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरात यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार पक्षातून सुरु असल्याचे समजते. त्यामुळे आता राज्यातील घडामोडीना वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT