Vidhan Parishad Election: महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अखेर सोमवारी (ता.1 जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.त्यानुसार आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.पण आता उमेदवारांची याद्या जाहीर झाल्यानंतर महायुती असो वा महाविकास आघाडी बंडखोरीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
विधानपरिषद निवडणुकीत ऐनवेळी पत्ता कट झाल्यानं जवळपास सर्वच मतदारसंघात नाराजीची लाट पसरली असून बंडखोरी उफाळून आली आहे.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असून काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे मतदारसंघातील लढतींचं चित्रच बदललं आहे.
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाच जागेसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.मात्र,प्रमुख लढत ही महायुतीचे उमेदवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातच होणार आहे.पण आता याचवेळी प्रत्येक मतदारसंघात नाराजी उफाळून आली असून इच्छुकांनी पक्षाचा आदेश धुडकावून लावत अपक्ष अर्ज जाखल करत बंडखोरी केली आहे.
महायुतीमध्ये भाजप 11 जागांवर निवडणूक लढवत असून शिंदेंची शिवसेना 4 जागांवर मैदानात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपात 2 जागा मिळाल्या आहेत.
तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक 8 जागा लढणार आहे. त्यात.उद्धव ठाकरेंची शिवसेना 6, शरद पवारांच्या राष्ट्रवादीन 3 जागांवर उमेदवार देणार आहे.या सर्व जागांवरील प्रमुख लढती आता निश्चित झाल्या असल्या तरी खरे चित्र 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या 17 मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा कोण अधिकृत उमेदवार आहेत,याची माहिती आता समोर आली आहे.
महायुतीमध्ये रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी यांनी बंडखोरी केली आहे.तर छत्रपी संभाजीनगर-जालना-भाजपकडून सुहास शिरसाठ यांना उमेदवार जाहीर झाल्यावर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तारांची बंडखोरी केली आहे.
तर दुसरीकडे यवतमाळला शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींना उमेदवारी दिल्यानंत भाजपचे नितिन भुतडा व राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांची बंडखोरी केली आहे.पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी दिली असून भाजपचे प्रदीप कंद यांच्याकडून बंडखोरीचंनिशाण फडकवण्यात आलं आहे.
अमरावतीत भाजपकडून प्रविण पोटेंना उमेदवारी,शिवसेनेचे विप्लव बजोरियांची बंडखोरी केी आहे. तर नाशिकला शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी देण्यात आल्यानंतर अपक्ष गोकूळ गिते,गणेश गितें यांनी उमेदवारी अर्ज,महाजनांचे निकटवर्तीय असंही सांगण्यात येत आहे.
तर मराठवाड्यातील परभणीतून शिवसेनेनं सईदा खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे,तर राष्ट्रवादीकडून विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकरांची बंडखोरी उफाळून आली आहे. तसेच नांदेडमधून भाजपनं अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी दिली आहे.
तर ,राष्ट्रवादीचे प्रविण पाटील चिखलीकरांची बंडखोरी करत राष्ट्रवादीचं आव्हान उभं केलं आहे. तसेच जळगावला भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी देण्यात आलंय. शिवसेनेचे रेश्मा काळे,दिपक धांडेची बंडखोरी केली आहे.
महाविकास आघाडीत नांदेड-काँग्रेसनं रामदास सुमठाणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर माधवगाव जवळकरांची बंडखोरी,नागेश अष्टीकरांचा मुलगा कृष्णा आष्टीकरांवू ठाकरे गटाकडून बंडखोरी केली आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसकडून प्रफुल अग्रवाल यांना मैदानात उतरवले आहे.
तर दुसरीकडे सांगली-शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील यांनी अर्ज भरला आहे.तसेच तर काँग्रेस संजय मेंढे आणि मयूर पाटील यांनी अर्ज भरला आहे. तसेच सोलापूरमध्ये काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वसंत नाना देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश अक्कलकोटेंची बंडखोरी केली आहे,
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.