

Kolhapur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात विषारी दारूने 18 जणांचा बळी गेल्यानंतर थेट अधिकाऱ्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. तब्बल 23 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. दारू अड्यांकडे दुर्लक्षित केल्यामुळे पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील 8 पोलीस आणि 13 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या या धडक कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे.
एरवी दारू अड्डे दिसून न दिसल्यासारख्या करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आता हे बेकायदेशीर दारूअड्डे उध्वस्त करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 135 गुन्हे दाखल झाले असून सांगलीत 29 आरोपीना अटक केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांमध्ये कारवाईसाठी चांगली स्पर्धा लागली आहे. शनिवारी एका दिवसात बेकायदेशीर 71 दारू अड्डयावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवायांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
मोरेवाडी, सरनोबतवाडी, कणेरीवाडी (ता. करवीर), येर्तेहट्टी (ता. चंदगड), दानोळी (ता. शिरोळ), नेसरी, हेब्बाळ, जलद्याळ (ता. गडहिंग्लज), बहिरेवाडी, मुमेवाडी (ता. आजरा), निगवे, पोहाळे (ता. पन्हाळा), माले मुडशिंगी, हेरले, नागाव (ता. हातकणंगले), करंजफेण (ता. शाहूवाडी), म्हाळुंगे (ता. करवीर), म्हाकवे (ता. कागल) आणि जाखिनपेठ (ता. भुदरगड) या ठिकाणी कोल्हापुरात कारवाई करण्यात आली.
सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण 41 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये 29 आरोपींना अटक करण्यात आली. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
जिल्ह्यात दिनांक 29 ते 31 मे 2026 या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एक वाहन व मुद्देमालासह एकूण 5 लाख 71 हजार 765 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.