Eknath Shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : महायुतीमध्ये कुठलेही कोल्ड वॉर नाही; सर्व काही थंडा कूल कूल; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकावर पलटवार

Eknath Shinde on opposition News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकाकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे महायुतीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. सोमवारपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकाकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

विरोधकांच्या मते आमच्यात कोल्ड वॉर सुरु आहे. पण कसले कोल्ड वॉर, सगळं कसं थंडा कूल कूल आहे. महाविकास आघाडी महायुतीत (Mahayuti) हाच एक मोठा फरक आहे. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही. जनतेच्यासाठी विकासासाठी आम्ही एकत्र आले आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या सरकारकडून विरोधकांना चहापानाचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आम्हाला ऋृणातून उतराई व्हायचे आहे. विरोधकांची संख्या कमी कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांनी आता आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आमदार कमी पण पत्र जास्त

विरोधकांचे आमदार कमी आहेत, पण त्यांची पत्र जास्त आले आहेत. विरोधकांचा विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढं काम जनतेनं करून ठेवलं आहे. आता मी विरोधकांवर टीका करत नाही. येत्या काळात आम्ही चांगलं काम करणार आहोत. आरोपांना आम्ही कामाने उत्तर दिले आहे आणि यापुढेही कामानेच उत्तर देणार आहोत, असे यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमच्या खुर्चीची आदलाबदल झाली

निवडणुकीनंतर आता महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प होत आहे. महायुती सरकारची टर्म नवीन असली तरी टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खुर्चीची आदलाबदल झाली, पण अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT